एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला स्थगिती नाही; आता यातूनचं पुढे जाणं भाग : हायकोर्ट
कोरोनाची परिस्थिती गंभीर असली तरी विद्यार्थ्यांचं भविष्य प्रदिर्घ काळ दावणीला बांधता येणार नाही, आता यातूनचं पुढे जाणं भाग आहे : हायकोर्टआयत्यावेळी कोर्टात धाव घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देता येणार नाही - हायकोर्ट8 सप्टेंबर पासूनच्या मेडिकलच्या परिक्षा प्रत्यक्ष हजेरीतच पार पडणार
मुंबई : अंतिम वर्षाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेत प्रत्यक्ष हजेरी पद्धतीवर आक्षेप घेत हायकोर्टात आलेल्या विद्यार्थ्यांना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या नऊ विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यामुळे येत्या मंगळवारपासून महाराष्ट्रात होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
8 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात वैद्यकीय परीक्षा सुरू होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला विरोध करत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचसी) अंतिम वर्षाच्या विविध अभ्यासक्रमाच्या नऊ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. एमयूएचसीने 21 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला या याचिकेमार्फत आव्हान दिले होते. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरित्या हजर राहून परीक्षा देण्याचे आदेश एका परिपत्रकातून देण्यात आले आहेत. त्यालाच या विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. संबंधित याचिकेवर शनिवारी तातडीने न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
अशा होणार अंतिम वर्षातील परीक्षा; कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची माहिती
याचिकाकर्त्यांनी शेवटच्या क्षणाला हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्यामुळे याप्रकरणात आम्ही परीक्षेला स्थगिती देत अंतरिम दिलासा देऊ शकत नाही असं स्पष्ट मत खंडपीठाने आपल्या आदेशात नोंदवत याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या 17 ऑगस्ट रोजीच्या जेईई-मुख्य आणि एनईईटी (NTTE)परीक्षा पुढे ढकलण्यासही नकार देण्याच्या आदेशाचा दाखलाही खंडपीठाने यावेळी दिला. जरी बाहेर कोरोनामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली असली तरी त्यातूनच आता पुढे जाणं भाग आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य ऐवढा प्रदिर्घ काळ दावणीला बांधणे योग्य नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचा संदर्भ खंडपीठाने आपल्या आदेशात देत याचिकेवरील सुनावणी 17 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.
Exam Pattern | विद्यापीठ परीक्षांचा अधिकृत पॅटर्न सर्वात आधी 'माझा'वर, प्रमोद येवले यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement