एक्स्प्लोर

खात्यातील पैसे मुलीला द्या, चिठ्ठी लिहून बॉलिवूड डान्सरची आत्महत्या

अभिजीतने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. या सुसाईड नोटमधील तपशील अद्याप समोर आलेला नाही.

मुंबई: बॉलिवूडमधील अनेक सिनेमात डान्स केलेल्या डान्सरने आत्महत्या केली आहे. अभिजीत शिंदे असं या 32 वर्षीय डान्सरचं नाव आहे. अभिजीतने बुधवारी भांडुपमधील राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिजीतने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. या सुसाईड नोटमधील तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र कौटुंबिक तणाव, आर्थिक चणचण आणि काही दिवसांपासून काम न मिळाल्याने, अभिजीतने टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या आत्महत्येची नोंद भांडुप पोलिसात झाली आहे. कौटुंबिक तणाव दरम्यान, अभिजीतच्या कुटुंबात सध्या तणाव होता. त्याची पत्नी तीन महिन्यांपासून त्याच्यासोबत राहात नव्हती. अभिजीतला दोन वर्षांची मुलगी आहे. मात्र पत्नी अभिजीतला मुलीला भेटू देत नव्हती. त्यामुळे अभिजीत तणावात होता, असं पोलिसांनी सांगितलं. या तणावातून अभिजीतने बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गळफास घेऊन आयुष्य संपवलं. अभिजीत राहत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे काही शेजाऱ्यांनी चौकशी केली असता, अभिजीतने गळफास घेतल्याचं समोर आलं. शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, अभिजीतला रुग्णालयात हलवलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.  ‘बँक खात्यातील पैसे मुलीला द्या’ अभिजीतजवळ जी सुसाईड नोट आढळली आहे, त्यात त्याने आपल्या बँक खात्यातील पैसे मुलीला द्या असं म्हटलं आहे. दिग्गजांसोबत काम दरम्यान, अभिजीतने बॉलिवूडमधील अनेक नामांकित अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. रणबीर कपूर, रणवीर सिंह यांच्यासोबत त्याचे फोटो आहेत. बॉलिवूडमधील सहकलाकार असो किंवा अभिजीतसारखे डान्सर असो, अशा कलाकारांचा संघर्ष, स्ट्रगल हा लपून राहिलेला नाही. कामाच ताण असो वा कौटुंबिक तणाव, विविध कारणांनी अनेक कलाकारांनी आयुष्य संपवलं आहे. त्यात सातत्याने वाढच होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Wildlife Board : महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
Maharashtra HSC Exam : राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget