Hit and Run Case: हिट अॅण्ड रन प्रकरण: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मृतांच्या कुटुबीयांच्या नुकसानभरपाईत आठपटीने वाढ
Hit And Run Case : 'हिट अॅण्ड रन' अपघातातील पीडित आणि जखमींच्या नुकसानभरपाईबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Hit And Run Case : देशात रस्ते अपघातांची संख्या वाढत आहे. केंद्र सरकारने आता अशा प्रकारच्या रस्ते अपघाताच्या अनुषंगाने मोठं पाऊल उचलले आहे. हिट अॅण्ड रन प्रकरणात पीडित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नुकसान भरपाईच्या किंमतीत आठपटीने वाढ करण्याच्या निर्णय घेतला आहे. येत्या एक एप्रिलपासून हा नवीन नियम लागू होणार आहे.
किती मिळणार नुकसानभरपाई?
एक एप्रिलनंतर रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये दिले जातील. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्याशिवाय जखमी झालेल्या व्यक्तीला देण्यात आलेल्या नुकसानभरपाईच्या रक्कमे वाढ करण्यात आली आहे. आता जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहे. याआधी ही रक्कम 12,500 रुपये इतकी होती.
एक एप्रिल 2022 पासून नियम लागू
या नव्या योजनेचे नाव 'हिट अॅण्ड रन मोटर अपघात योजना पीडित नुकसानभरपाई, 2022' असे असणार आहे. ही योजना एक एप्रिल 2022 पासून लागू करण्यात येणार आहे. ही योजना 1989 मधील योजनेऐवजी लागू करण्यात येणार आहे.
नुकसानभरपाईत कितीची वाढ?
हिट अॅण्ड रनमध्ये गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये आणि मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. याआधी मृत्यू झाल्यास 25 हजार इतकीच नुकसानभरपाई मिळत होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेन युद्धाने मद्यप्रेमींची 'झिंग' उतरणार? बीअरचे दर वाढण्याची भीती
- Fuel Price : इंडियन ऑइलचा झटका; 'या' देशात पेट्रोलच्या दराचे द्विशतक, भारताचे काय?
-
Medical Emergency साठी तासभरात मिळतील हक्काचे एक लाख; जाणून घ्या योजना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha