एक्स्प्लोर

मालमत्ता कर वसूलीसाठी मुंबई महापालिकेची शक्कल, खाजगी कंत्राटदार नेमण्याची शक्यता

गेल्या आठवड्यापासून महापालिकेने थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारताच सुरुवातीला कर भरण्यास टाळाटाळ करणा-या अनेकांनी मालमत्ता कर भरण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे 10 कोटींची कर वसुली झाली आहे.

मुंबई : मालमत्ता कर थकबाकीसाठी पालिका वेगवेगळी शक्कल लढवत आहे. आधी मुंबई पालिकेनं दवंडी दिली नंतर मोठ्या व्यावसायिक थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरु केली. पालिकेकडून एका आठवड्याभरात 3392 मालमत्ता कर थकवणाऱ्या मालमत्ता जप्त तसेच 200 थकबाकीदारांचे पाणी तोडण्याची देखील कारवाई करण्यात आली. मात्र आता ही कारवाई अधिक वेगानं करण्यासाठी खाजगी कंत्राटदार नेमण्याचा पालिकेचा विचार आहे. खाजगी कंत्राटदार नेमल्यास कर वसूली अधिक वेगानं होईल असा मुंबई महानगरपालिकेचा दावा असला तरी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रणा असताना खाजगी कंत्राटदाराचाच आग्रह का? असा प्रश्न आता समोर येत आहे. महानगरपालिका सध्या ज्या गतीनं मालमत्ता कराची वसूली करत आहे त्या गतीनं मालमत्ता कर वसूलीचं लक्ष्य गाठलं जाऊ शकतं. मात्र, तरीही खाजगी कंत्राटदारांचा यातील सहभाग गैरव्यव्हारांनाही आमंत्रण देऊ शकतो. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे 4 लाख 50 हजार मालमत्ता धारक आहे. यामध्ये 1 लाख 27 हजारांपेक्षा अधिक निवासी, 67 हजारांपेक्षा अधिक व्यवसायिक, औद्योगिक स्वरुपाच्या 6 हजारांपेक्षा अधिक मालमत्ता धारक आहे. 12 हजार 156 भूभाग आणि इतर प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्तांच्या मालमत्ता-कराचे आर्थिक वर्ष 2019-20 चे वसुली लक्ष्य हे 5 हजार ४०० कोटी रूपये एवढे आहे. यापैकी गेल्या आठवड्यापूर्वी पर्यंत 3 हजार 154 रूपये कोटी एवढी रक्कम वसूल झाली होती. यानुसार दैनंदिन वसुली ही साधारणपणे 10 कोटी रुपये एवढीच होती. गेल्या आठवड्यापासून महापालिकेने थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारताच सुरुवातीला कर भरण्यास टाळाटाळ करणा-या अनेकांनी मालमत्ता कर भरण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे 10 कोटी असणारी दैनंदिन वसुली आता दररोज 40 ते 50 कोटींपर्यंत पोहचली आहे. यानुसार गेल्या आठवड्याभरातच 350 कोटी रुपयांचा भरणा थकबाकीदारांनी महापालिकेकडे केला आहे. BMC 2022 | 'अब की बार भाजप सरकार', मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आशिष शेलारांचा नारा संबंधित बातम्या : मुंबई महापालिकेची मालमत्ता करवसूलीची कारवाई सुसाट, आठवड्याभरात 3392 कर थकवणाऱ्या मालमत्ता जप्त मालमत्ता कर वसूलीसाठी पालिकेची दवंडी, पुढच्या आठवड्यापासून जप्तीची कारवाई मुंबई महापालिकेकडून 228 मालमत्तांवर जप्तीची कारवाई
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget