एक्स्प्लोर

मालमत्ता कर वसूलीसाठी पालिकेची दवंडी, पुढच्या आठवड्यापासून जप्तीची कारवाई

मालमत्ता कराची वसूली थकल्यानं मुंबई महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे, तिजोरीची गळती कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आता मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये अशी दवंडी पिटून मालमत्ता कराचा भरणा न केल्यास काय कारवाई होऊ शकते हे ही सांगितले जात आहे.

मुंबई : मालमत्ता करासाठी मुंबई महापालिका आक्रमक झाली आहे. एकीकडे 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करणाऱ्या पालिकेकडून इतर थकीत मालमत्ता कर वसूलीसाठी दवंडी देण्यात येत आहे. मालमत्ता कर न भरल्यास व्यावसायिक मालमत्ताधारकांवर पुढच्या आठवड्यापासून जप्तीची कारवाई सुरु होणार आहे. मालमत्ता कराची वसूली थकल्यानं मुंबई महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे, तिजोरीची गळती कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, मुंबई महापालिकेकडून आता दवंडी पिटून मालमत्ता कराचा भरणा करण्याविषयी मुंबईकरांना सूचना दिल्या जात आहेत. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये अशी दवंडी पिटून मालमत्ता कराचा भरणा न केल्यास काय कारवाई होऊ शकते हे ही सांगितले जात आहे. कारवाईत मालमत्तेची जप्ती होऊ शकते तसेच पाणीपुरवठा रोखला जाऊ शकतो. 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी दिल्यानंतर पालिकेला 398 कोटींचा फटका बसला आहे. त्यात, निश्चित धोरणाच्या अभावामुळे इतर मालमत्तांचीही वसूली रखडली आहे. एकूण मुंबई महापालिकेचा एकूण 12 हजार कोटींचा मालमत्ता कर थकला आहे. त्यापैकी 9000 हजार कोटींच्या मालमत्ता करासाठी विविध कोर्ट केसेस सुरु आहेत. उर्वरीत 3000 कोटींच्या थकीत मालमत्ता करापैकी 1,500 कोटींचा मालमत्ता कर येत्या दोन महिन्यांत म्हणजेच मार्च अखेरीपर्यंत (आर्थिकवर्ष समाप्तीपर्यंत) वसूल करण्याचं लक्ष्य आहे. यासाठी, मुंबई महापालिकेनं मालमत्ता कर वसूलीची मोहिम हाती घेतली आहे. मुंबईकरांना मालमत्ता कर भरणासाठी जागृत करण्यासाठी ही मोहीम आहे. पुढील आठवड्यापासून महापालिका आक्रमक होत टॉप 5 व्यावसायिक मालमत्तांची कर न भरल्यास जप्ती करणार आहे. 10 व्यावसायिक मालमत्तांचा कर न भरल्यास लिलाव होणार आहे. महापालिकेनं सुरुवातीला प्रत्येक वॉर्ड मधील 100 अशा 24 वॉर्ड मधील 2400 व्यावसायिक मालमत्तांची वसूली तातडीनं करण्याचे किंवा त्यांवर कारवाई करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. रहिवासी भागांतील मालमत्तांवर मात्र इतक्यात कारवाई होणार नाही. मात्र, सर्वसामान्य करदात्या मुंबईकरांनी लवकरात लवकर मालमत्ता कर भरावा यासाठी पालिकेनं मोठी मोहीम हातात घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget