एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई शहरातील नगरसेवकांची संख्या कमी होणार
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना, महापालिका निवडणुकीसाठीच्या वॉर्ड पुनर्रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई शहरातील सात वॉर्ड कमी होणार असून, तर पश्चिम उपनगरात पाच आणि पूर्व उपनगरात दोन वॉर्ड वाढणार आहेत. यामुळं मुंबई शहर परिसरातील नगरसेवकांची संख्या 63 वरून 56 होणार आहे.
कुठल्या वॉर्डची संख्या घटणार आहे?
ए ( फोर्ट), बी( पायधुनी), सी(चंदनवाडी), डी (ग्रँट रोड), ई (भायखळा) या विभागातील प्रत्येकी एक, तर जी दक्षिण (प्रभादेवी) विभागातील दोन वॉर्ड कमी होणार आहेत. पूर्व उपनगरात एम पूर्व (चेंबूर), एन (घाटकोपर) या दोन विभागातील प्रत्येकी एक वॉर्ड कमी करण्यात येणार आहे. पश्चिम उपनगरातील एच पूर्व (सांताक्रुझ) विभागातील एक वॉर्ड कमी झाला आहे.
वॉर्डची संख्या कुठे वाढणार आहे?
एल (कुर्ला), एस (भांडुप) विभागात एक वॉर्ड वाढला आहे. एम पूर्व (मानखूर्द) विभागात दोन वॉर्ड वाढले आहेत. तर पी दक्षिण (गोरेगाव) आणि आर उत्तर (दहिसर) या विभागातील वॉर्डची संख्या एकने वाढली आहे. तसंच पी उत्तर (मालाड), आर दक्षिण (कांदिवली) विभागात प्रत्येकी दोन वॉर्ड वाढणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement