एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एक झाड तोडल्यास दोन रोपांची लागवड बंधनकारक : मुंबई पालिका

मुंबईत कोणतंही झाड तोडल्यास त्या मोबदल्यात दोन रोपांचं वृक्षारोपण करणं बंधनकारक असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं मुंबई हायकोर्टात दिली.

मुंबई : मुंबईत कोणतंही झाड तोडल्यास त्या मोबदल्यात दोन रोपांचं वृक्षारोपण करणं बंधनकारक असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं मंगळवारी मुंबई हायकोर्टात दिली. पालिका आयुक्त झाडं तोडायची परवानगी देतातच कसे? या हायकोर्टाच्या सवालावर उत्तर देताना, या कामात त्यांना उद्यान समितीतील जाणकार नेहमी सहाय्य करत असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं. महापालिका आयुक्त जरी या विषयातले जाणकार नसले तरी त्यांच्या देखरेखीखाली यावर निर्णय घेतला जातो. तसंच या परवानग्या अत्यावश्यक आणि लोकोपयोगी प्रकल्पांसाठी खासकरुन दिल्या जातात. हॉस्पिटल, गृहनिर्माण प्रकल्प यांचं बांधकाम अडकून न राहता तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, हीच त्या वृक्षतोडीमागची भावना असते, असं पालिकेकडून सांगण्यात आलं. याचिकाकर्ते झोरु भाटेना यांनी वृक्षप्राधिकरण समितीच्या तरतुदींना हायकोर्टात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर बुधवारीही सुनावणी सुरु राहील. लोकांना एखादं झाड तोडलं जाणार असेल तर ते का कळू दिलं जात नाही. हा प्रकार सहन केला जाणार नाही असंही हायकोर्टानं सुनावलं. त्यामुळे कोणतंही झाड तोडताना त्याला योग्य ती प्रसिद्धी द्या. जेणेकरुन त्यावर आक्षेप असणारे त्याला आव्हान देऊ शकतील, असं कोर्ट म्हणालं. एखाद्या विभागातील 25 पेक्षा कमी झाडं तोडायची असतील तर मनपा आयुक्तांची परवानगी घेतली जाते. त्यापेक्षा अधिक वृक्ष संख्या असेल तर वृक्ष प्राधिकरणाकडे ते प्रकरण जातं. पण या जानेवारीत 25 पेक्षा कमी वृक्ष असलेले 49 प्रस्ताव मनपा आयुक्तांना सादर करण्यात आले. मनपा आयुक्तांकडे अशा प्रस्तावांवर विचार करण्यासाठी वेळही नाही आणि तसे तज्ज्ञही नसल्यानं फारशी शहानिशा न करताच वृक्षतोड परवानगी दिली जात असल्याची याचिका झोरु भाटेना यांनी हायकोर्टात केली आहे. केवळ मेट्रो नव्हे तर एसआरए किंवा अन्य प्रकल्पांच्या अंमलबजावणीवेळी असाच प्रकार होत असल्याचं भाटेना यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaNCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Embed widget