Jain Temple Demolition : विलेपार्लेतील जैन मंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची हकालपट्टी, महापालिका आयुक्तांचे आदेश
Vile Parle Jain Temple Demolition : मुंबई महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांच्या आदेशाने विलेपार्ले येथील जैन मंदिरावर तोडक कारवाई करण्यात आली होती.

मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मंदिर तोडक कारवाईनंतर निघालेल्या मोर्चानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी नवनाथ घाडगे यांच्या हकालपट्टीचा आदेश (Navnath Ghadage Suspended) काढला.
वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांच्या आदेशाने पालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दिगंबर जैन मंदिरावर तोडक कारवाई केली होती. याच मंदिर तोडक कारवाई प्रकरणी जैन समाजाच्या लोकांनी विलेपार्लेपासून अंधेरी पूर्वमधील पालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर महापालिकेने या अधिकाऱ्यावर कारवाई केली.
Navnath Ghadage Suspended : दहा दिवसांपूर्वीच बदली, आता निलंबन
मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरात दिगंबर जैन मंदिरावर पालिकेने तोडक कारवाई केली. त्याविरोधात विश्व हिंदू परिषद आणि जैन समाजाने धडक मोर्चा काढला. जैन मंदिरावर कारवाई केलेल्या वॉर्ड ऑफिसरवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पालिकेचे सहाय्यक आयुक्त म्हणून अंधेरी के/पूर्व विभागात नवनाथ घाडगे यांची दहा दिवसांपूर्वीच बदली करण्यात आली होती. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
जैन समाज आक्रमक
विले पार्लेतील जैन मंदिरावर तोडक कारवाई दरम्यान जैन धर्मियांचे धार्मिक पुस्तक आणि धार्मिक वस्तू पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्तावर फेकल्याचा आरोप करण्यात आला. धार्मिक पुस्तक आणि धार्मिक वस्तू बाहेर काढल्यानंतर कारवाई करावी अशी विनंती केल्याचा दावा काही जैन समाजातील लोकांनी केला. जैन धर्मियांच्या विनंतीला मान न देता पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने केली तोडक कारवाई केल्याचा आरोप जैन समाजाकडून करण्यात येत आहे. तसेच ज्या ठिकाणी जैन मंदिर होते, त्या ठिकाणी ते पुन्हा बांधून देण्याची मागणी जैन धर्मियांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, हायकोर्टाकडून जैन मंदिर तोडक कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे.
आमची अशी अनेक मंदिरं तोडली
ही कारवाई करत असताना जैन धर्मगुरुंनी त्यावर प्रतिक्रिया दिली. आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध करत आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही एवढाच सांगतो की, यापुढे अशा मंदिरांवर कारवाई होत असेल तर आपण यामध्ये लक्ष घालावे. आमची अशी अनेक मंदिरं तोडली आहेत. एका हॉटेलवाल्याने आमच्यावर कारवाई केली. यामध्ये अनेक मोठे राजकारणी देखील शामिल आहेत. त्यामुळे आता संपूर्ण जैन समाज महाराष्ट्रभर एकवटला आहे, असं आंदोलनावेळी उपस्थित असणाऱ्या जैन धर्मगुरुंनी सांगितले.
ही बातमी वाचा:


















