एक्स्प्लोर

Mumbai Jain Temple: विलेपार्लेमधील जैन मंदिरावर महापालिकेचा हातोडा, जैन समाज आक्रमक; मंगलप्रभात लोढा, पराग अळवणी आंदोलनस्थळी दाखल

Mumbai Jain Temple: मुंबईतील विलेपार्ले पूर्व मधील कांबळीवाडी येथील 30 वर्षे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महापालिकेने तोडक कारवाई केली.

Mumbai Jain Temple मुंबई: मुंबईतील विलेपार्ले पूर्व मधील कांबळीवाडी येथील 30 वर्षे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर (Vile Parle Jain Temple) मुंबई महापालिकेने (Mumbai Muncipal Corporation) तोडक कारवाई केली. हायकोर्टाच्या आदेशाने मुंबई महानगरपालिका के/पूर्व विभागाकडून जैन मंदिरावर 16 एप्रिल रोजी तोडक कारवाई करण्यात आली होती. महानगर पालिकेच्या या कारवाई विरोधात जैन समाज आक्रमक झाला आहे. आज (19 एप्रिल) जैन समाजाच्या महिला आणि पुरुष मंदिरा बाहेर आंदोलन करत आहेत. विलेपार्ले मतदारसंघाचे आमदार पराग अळवणी हेसुद्धा आंदोलनस्थळी दाखल झालेत. तसेच मंत्री आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी देखील आंदोलनस्थळी  भेट दिली.

मुंबई महानगरपालिका विरोधात विश्व हिंदू परिषद आणि जैन समाजाचा उपस्थितीमध्ये विलेपार्ले ते अंधेरी पूर्व परिसरात पालिकेच्या के/पूर्व कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. तसेच पालिका के/पूर्व विभागाचे वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची विनंती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जैन समाजाकडून करण्यात आली आहे. 

जैन समाज आक्रमक-

जैन मंदिरावर तोडक कारवाई दरम्यान जैन धर्मियांच्या धार्मिक पुस्तक आणि धार्मिक वस्तू पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्तावर फेकण्याचा आरोप करण्यात येत आहे. धार्मिक पुस्तक आणि धार्मिक वस्तू काढून द्यावी, जैन धर्मियांच्या विनंतीला मान न देता पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने केली तोडक कारवाई केल्याचा आरोप जैन समाजाकडून करण्यात येत आहे. तसेच ज्या ठिकाणी जैन मंदिर होते, त्या ठिकाणी ते पुन्हा बांधून देण्याची मागणी जैन धर्मियांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, हायकोर्टाकडून जैन मंदिर तोडक कारवाईवर स्टे देण्यात आला आहे. 

आमची अशी अनेक मंदिरं तोडली-

आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध करत आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही एवढाच सांगतो की, यापुढे अशा मंदिरांवर कारवाई होत असेल तर आपण यामध्ये लक्ष घालावे. आमची अशी अनेक मंदिरं तोडली आहेत.  एका हॉटेलवाल्याने आमच्यावर कारवाई केली. यामध्ये अनेक मोठे राजकारणी देखील शामिल आहेत. त्यामुळे आता संपूर्ण जैन समाज महाराष्ट्रभर एकवटला आहे, असं आंदोलनावेळी उपस्थित असणाऱ्या जैन धर्मगुरूंनी सांगितले. 

संबंधित बातमी:

Shirish Valsangkar Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर रात्री 8 वाजता जेवले, 8.30 वाजता अचानक उठले अन्...; आयुष्य संपवण्याआधी घरात काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
धक्कादायक! गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलानेच आईचे लाखो रुपयांचे दागिने चोरले, आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलानेच आईचे लाखो रुपयांचे दागिने चोरले, आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात
Rohit Pawar on NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यातून कोणीतरी घरभाडं अन् ब्युटी पार्लरचे पैसे दिले, अजितदादांना समजल्यावर संतापले, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यातून कोणीतरी घरभाडं अन् ब्युटी पार्लरचे पैसे दिले, अजितदादांना समजल्यावर संतापले, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Embed widget