एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत 225 ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबणार : पालिका
महापालिकेच्या मान्सूनपूर्व सर्वेक्षणानुसार यावर्षी मुंबईतील 225 ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता आहे.
मुंबई : गेल्या वर्षीची 29 ऑगस्ट ही तारीख मुंबईकरांना चांगलीच लक्षात असेल. कारण मुंबईत या दिवशी मोठा पाऊस पडून ठिकठिकाणी पाणी तुंबलं होतं आणि मुंबई ठप्प झाली होती. महापालिकेच्या मान्सूनपूर्व सर्वेक्षणानुसार यावर्षी मुंबईतील 225 ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षात मुंबईत पाऊस किती आणि कसा होईल याचा नेमका अंदाज नसला तरी मुंबई तुंबणार हे आधीच निश्चित झालं आहे.
गेल्या वर्षी 29 ऑगस्टला तुंबलेल्या जागांमध्ये आता वाढ होणार आहे. मेट्रो रेल्वे आणि विविध नागरी कामांसाठी सुरु असलेल्या खोदकामांमुळे या तुंबणाऱ्या जागांच्या संख्येत वाढ होणार आहे.
महापालिकेच्या मान्सूनपूर्व सर्वेक्षणानुसार मुंबईतील 225 ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. यापैकी 60 ठिकाणं दरवर्षी हमखास पाण्याखाली जातात. मात्र मुंबईत सुरु असलेल्या विविध विकासकामांमुळे पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार आहे.
17 ठिकाणी विकास कामं सुरु आहेत. वांद्रे पूर्व, भायखळा, चेंबूर, मुलुंड, घाटकोपर, गोरेगाव पश्चिम, बोरिवली पश्चिम, सायन, किंग्ज सर्कल, कुर्ला, वांद्रे, माहिम, खार, दादर, माटुंगा या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता जास्त आहे.
पावसाचे पाणी उपसण्यासाठी 19 पंप आहेत, तर 279 पंप भाड्याने घेतले जातात. यासाठी यंदा 54 कोटींचा खर्च करण्यात येईल.
मुंबईत पाणी तुंबणाऱ्या जागांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि वाहतूक पोलिस विभाग यांची एक स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या आठवड्यात मुंबईत पाणी तुंबणाऱ्या जागांचा आढावा घेईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
जॅाब माझा
जळगाव
Advertisement