एक्स्प्लोर

अंधेरी पूल दुर्घटनेची जबाबदारी महापालिकेचीच, हायकोर्टाने खडसावलं

‘प्रत्येकवेळी पूल पडण्याची वाट का पाहता,पालिकेने सर्व पुलांचे याआधीच ऑडिट का केले नाही,’ असं विचारत हायकोर्टाने महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर आसूड ओढला आहे.

मुंबई : ‘मुंबईतील नागरी सुविधांशी संबंधित अपघातांसाठी महानगरपालिका प्रशासनच जबाबदार आहे,त्यांनी आपली जबाबदारी झटकू नये, ’ असं म्हणत मुंबई हायकोर्टाने महापालिका प्रशासनाला फटकारलं आहे. ‘प्रत्येकवेळी पूल पडण्याची वाट का पाहता,पालिकेने सर्व पुलांचे याआधीच ऑडिट का केले नाही,’ असं विचारत हायकोर्टाने महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर आसूड ओढला आहे.  पालिकेचे नगरसेवक आणि वॉर्ड अधिकारी यांना कधीच जबाबदार का धरलं जात नाही, असा सवालही यावेळी हायकोर्टाने केला. दुर्घटना घडल्यानंतर त्याची नक्की जबाबदारी कोणाची यावरुन दरवेळी पालिका आणि रेल्वे यांच्यात कलगीतुरा रंगतो. त्यावर ‘रेल्वे ही काही परदेशी संस्था नाही,त्यामुळे इथं हद्दीचा प्रश्न निर्माणच होत नाही,’ असं हायकोर्टाने म्हटलं आहे. ‘आजही रेल्वेवरच मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचा सर्वाधिक ताण पडतो. वाहतुकीसाठी  सागरी मार्गाचा गांभीर्याने विचार का केला जात नाही,’ असा प्रश्न विचारत हायकोर्टाने प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान,स्मिता ध्रुव यांनी एलफिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरी संदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या १२ जुलैला होणाऱ्या सुनावणीस महाधिवक्ता आणि केंद्र सरकारच्या मुख्य वकिलांना हजर राहण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. अंधेरीतील दुर्घटना अंधेरी रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग काल सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला होता. यावेळी ढिगाऱ्याखाली अडकून पाच जण गंभीर जखमी झाले. हा फुटपाथ थेट ओव्हरहेड वायरवर कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. या दुर्घटनेवरुन पालिका प्रशासन आणि रेल्वे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

मद्यपान करुन पुराच्या पाण्यात पोहण्याचा मोह महागात पडला, वसईच्या भोईदा पाडा इथं एक जण बुडाला 
मद्यपान करुन पुराच्या पाण्यात पोहण्याचा मोह महागात पडला, वसईच्या भोईदा पाडा इथं एक जण बुडाला 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2026 | शनिवार
टीईटी पेपरफुटी प्रकरण! आग्र्यातून तीन आरोपींना अटक, प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा संशय
टीईटी पेपरफुटी प्रकरण! आग्र्यातून तीन आरोपींना अटक, प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा संशय
Maharashtra Rain : राज्यभर पावसाचं धुमशान! मुंबई-ठाण्यासह कोकणात जलमय स्थिती, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यभर पावसाचं धुमशान! मुंबई-ठाण्यासह कोकणात जलमय स्थिती, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Embed widget