एक्स्प्लोर

BMC भरतीची 'ही' अन्यायकारक अट मागे घ्या, अन्यथा दोन ते तीन लाख विद्यार्थ्यांचे नुकसान: आदित्य ठाकरे

जाहिरातीत दिलेल्या जाचक अटीमुळे दोन  ते तीन लाख मुला-मुलींना परीक्षेचा अर्जच भरता येणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

मुंबई :  बीएमसीतील (BMC)  कार्यकारी सहाय्यक पदासाठी  काढण्यात आलेल्या जाहिरातीतील जाचक अटी शिथिल करा, अशी मागणी करणारे पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी  यांना पत्र लिहले आहे. भरतीतील जाचक अटीमुळं अनेक उमेदवार अर्ज भरु शकणार नसल्यानं त्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळं आदित्य ठाकरे यांनी  महापालिका आयुक्तांकडे  अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी केली आहे.

मुंबई महापालिकेनं नुकतीच 1846 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेनं कार्यकारी सहायक (BMC Recruitment 2024) या पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली शैक्षणिक अर्हता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या  मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे, उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे  दोन  ते तीन लाख मुला-मुलींना परीक्षेचा अर्जच भरता येणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मुंबई महानगरपालिकतर्फे कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.  या जाहिरातीत नमूद केलेल्या अटींमध्ये "पहिल्या प्रयत्नात पदवी" उत्तीर्ण असणे ही जाचक अट घातली आहे. या कारणास्तव महाराष्ट्रातील दोन ते तीन लाख मुला-मुलींना परीक्षेचा अर्ज ही भरता येणार नाही व त्यांच्यासाठी ही अट अन्यायकारक आहे. सध्या महाराष्ट्रातील बेरोजगारीचा भयावह प्रश्न पाहता आपण कृपया या अटीच्या पुनरावलोकनासाठी योग्य ती कारवाई करावी व या अटीत बदल करावा. जेणेकरून अधिकाधिक योग्य आणि सक्षम उमेदवारांना या पदासाठी संधी मिळेल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल, ही विनंती.

मुंबई महापालिकेत 1846 पदांची भरती

मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. 25,500-81100 (पे मॅट्रिक्स-एम 15) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 9 सप्टेंबरपर्यंत आहे.

हे ही वाचा :

BMC Recruitment 2024 : गुड न्यूज, मुंबई महापालिकेत 1846 जागांची मेगा भरती, 81 हजारांपर्यंत पगार, अर्ज कधी करायचा? जाणून घ्या सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhangar Reservation : एसटी आरक्षणात धनगर समाज समावेशाबाबत स्थापन समितीची बैठकBharat Gogawale ST  President : भरत गोगवले यांची एसटी महामंडळाच्या अधयक्षपदी वर्णीदुपारी १२ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 Sept 2024JP Nadda On Mallikarjun Kharge : भाजप अध्यक्ष नड्डांचं मल्लिकार्जुन खरगेंच्या पत्राला प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Embed widget