एक्स्प्लोर

'कोविड-19' लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज

महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह निवडक खासगी इस्पितळांमध्येही लसीकरणाची सुविधा. टप्प्याटप्प्याने वाढविणार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केद्रांची संख्या.

मुंबई : केंद्र शासनाच्या आदेशानुसार 'कोविड-19' लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवारी 1 मार्च 2021 पासून सुरू होत आहे. या टप्प्यात वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच वयाची 45 वर्षे पूर्ण ते 60 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (comorbidity) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जाणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे देण्यात येत आहे.

केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाचा तिसरा टप्पा महापालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही राबविण्यात येणार आहे. खासगी इस्पितळांपैकी ज्या इस्पितळांमध्ये 'जन आरोग्य योजना' वा केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबविण्यात येत आहेत, अशा खासगी इस्पितळांना या लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारीतील निर्धारित रुग्णालयांमध्ये लसीकरण विनामूल्य असून खासगी इस्पितळात लसीकरणासाठी प्रत्येक मात्रेसाठी कमाल रुपये 250 एवढे शुल्क आकारले जाणार आहे.

केंद्रशासनाची 'जन आरोग्य योजना' राबविण्यात येणाऱ्या, तसेच केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 53 खासगी इस्पितळांची यादी प्राप्त झाली आहे. सदर रुग्णालयांमध्ये शासकीय नियमांनुसार पुरेशी जागा, मनुष्यबळ तसेच लसीकरणामुळे होणारे संभाव्य विपरीत परिणाम, व्यवस्थापन इत्यादींसाठी सुविधा उपलब्धता या बाबींचे सर्वेक्षण करुन लसीकरण केंद्र म्हणून निवड करण्यात येईल. त्यानंतर टप्या टप्याने सदर केंद्रांमध्ये लसीकरण सुरु करण्यात येईल.

1 मार्च 2021 पासून खाली नमुद केलेल्या महानगरपालिकेच्या अखत्यारीतील कोविड लसीकरण केंद्रात तिसरा टप्प्यातील विनामूल्य लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

  • बी.के.सी जंबो रुग्णालय, वांद्रे
  • मुलुंड जंबो कोविड रुग्णालय, मुलुंड
  • नेस्को जंबो कोविड रुग्णालय, गोरेगाव
  • सेवन हिल्स रुग्णालय, अंधेरी
  • दहीसर जंबो रुग्णालय, दहीसर

महानगरपालिकेच्या अखत्यारीतील इतर 19 लसीकरण केंद्रांमध्ये 2 मार्च 2021 पासून तिसऱ्या टप्प्यातील विनामूल्य लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या खासगी इस्पितळातील लसीकरण केंद्रात लसीकरण केवळ त्याच इस्पितळातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहील. राज्य शासनाकडून या संदर्भात धोरण निश्चित झाल्यानंतरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल.

यास्तव शासन आदेशान्वये बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जी खासगी इस्पितळे 'जन आरोग्य विमा योजना', केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असतील अशा खासगी इस्पितळांमध्ये 60 वर्षे वय पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 60 वर्षे वयोगटातील सह-व्याधी असलेल्या नागरिक यांचे लसीकरण 1 मार्चपासून सशुल्क पद्धतीने करण्यात येईल.

वरीलनुसार सदर खासगी इस्पितळांची नावे खालीलप्रमाणे :

  •  एच. जे. दोशी हिंदू सभा रुग्णालय, घाटकोपर
  •  के. जे. सोमय्या वैद्यकीय महाविदयालय, शीव
  • एस. आर. सी. सी. चिल्ड्रन रुग्णालय, महालक्ष्मी

वरील तपशिलानुसार संबंधित वर्गवारीत समाविष्ट असणाऱ्या नागरिकांनी 'कोविन डिजिटल' मंचावर (Android App) नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी आगाऊ नोंदणी करता येऊ शकेल किंवा लसीकरण केंद्रातही लसीकरणापूर्वी नोंदणी करता येऊ शकेल.

नोंदणी करताना नागरिकांनी आपली जन्मतारीख व इतर तपशील काळजीपूर्वक नमूद करावा. हा तपशील आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा निर्धारित केलेल्या शासकीय कागदपत्रातील तपशिलानुसार असणे आवश्यक आहे. तसेच लसीकरणाच्या वेळी सदर कागदपत्रे नागरिकांनी आठवणीने सोबत न्यावीत.

45 ते 60 वर्ष वयोगटातील सह-व्याधी असलेल्या 20 आजारांची यादी सोबत जोडली आहे. सदर सहआजार असलेल्या नागरिकांनी नोंदणीकृत वैदयकीय सेवा देणा-या व्यवसायिकांकडून प्रमाणित केलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्रात दाखविणे आवश्यक आहे. तर 60 वर्षावरील नागरिकांनी वयाबाबतचा योग्य पुरावा (कार्यालयीन, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र इ.) सादर करणे आवश्यक आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

अद्याप नोंदणी न झालेले आरोग्य कर्मचारी व कोविड आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांचे लसीकरण झाले नसल्यास त्यांनी लसीकरण केंद्रात जाऊन आपले ओळखपत्र (कार्यालयीन, आधारकार्ड, पॅनकार्ड) लसीकरण केंद्रात सादर करुन आपले लसीकरण करुन घेऊ शकतात.

भारत सरकारच्या निर्देशानुसार 'Co-win Digital Platform' हा 1 मार्च 2021 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून खुला करण्यात येईल. त्यानंतर वरीलनुसार संबंधित वर्गवारीत असणाऱ्या नागरिकांना स्वत: नोंदणी करता येईल. कोविन पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया सुरळीत होईपर्यत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Vidhan Parishad Speech | कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, ठाकरेंवर हल्लाबोलUjjwal Nikam On Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुनावणी, कोर्टात काय घडलं? वरिष्ठ वकील निकमांनी सांगितली A TO Z माहितीABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 26 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सAnil Parab vs Fadnavis : शिंदेंसारखे मुंबई रस्त्यावर उरुन डीप क्लिनिंग करणार का? परबांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Kumar Mishra : ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
आयुर्वेदिक डॉक्टरचा देशी जुगाड, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कारला केलं शेणाचं लेपन, 50 टक्के तापमान कमी 
आयुर्वेदिक डॉक्टरचा देशी जुगाड, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कारला केलं शेणाचं लेपन, 50 टक्के तापमान कमी 
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
Embed widget