एक्स्प्लोर
उद्घाटनाच्या वादावरुन मुंबईच्या महापौरांचा थेट मुख्यमंत्र्यांवरच लेटरबॉम्ब

मुंबईः महापालिकेच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आणखी एक लेटर बॉम्ब फोडला आहे. यामध्ये त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केलं आहे. राजशिष्टाचाराचं उल्लंघन करुन आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहू नये, अशी विनंती आंबेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. दहिसर येथील मुरबाळीदेवी खेळाचे मैदान आणि जलतरण तलाव यांचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांनी केलं. मात्र, या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेचा 3.50 कोटींचा निधी खर्च झाला आहे. तरीही या कार्यक्रमाला महापालिकेला स्थान न दिल्याची तक्रार महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी महापौरांनाही निमंत्रित करण्यात आलं नव्हतं. हा कार्यक्रम पालिकेचा अधिकृत कार्यक्रम नव्हता. राजशिष्टाचाराचं उल्लंघन करुन आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहू नये, असं महापौरांनी या पत्रात म्हटलंय.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























