एक्स्प्लोर

BMC : मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना 'दंडाचा' मोठा झटका; एक खड्डा, थेट 15 हजारांचा दंड, महापालिकेचा नवा नियम

Ganeshotsav 2025 : या आधी एका खड्ड्यामागे दोन हजारांचा दंड लावण्यात येत होता. आता त्यामध्ये साडेसात पट वाढ झाली असून दंडाची रक्कम 15 हजार इतकी निश्चित करण्यात आली आहे.

मुंबई : गणेशोत्सव जसजसा जवळ येतो आहे, तसतशी सार्वजनिक मंडळांची तयारीही जोरात सुरू झाली आहे. मात्र, यंदा मंडप उभारणीच्या कामात एक मोठा अडथळा समोर आला आहे, तो म्हणजे मुंबई महापालिकेचा नवा ‘दंड नियम’. गणेश मंडळांनी रस्त्यावर जर खड्डा खणला तर एका खड्ड्यामागे 15 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या निर्णयाला मंडळांनी विरोध केला असून महापालिकेने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली जात आहे.

महानगरपालिकेने परिपत्रक काढून स्पष्ट केलं आहे की, रस्त्यावर किंवा पदपथावर मंडपासाठी खड्डा खणला, तर त्या प्रत्येक खड्ड्याबाबत तब्बल 15 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पूर्वी हा दंड फक्त 2 हजार रुपये होता. म्हणजेच यंदा हा दंड तब्बल साडेसात पट वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ही कारवाई 'अन्यायकारक' असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

मंडळांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता

मंडळांचं म्हणणं आहे की, सार्वजनिक गणपती ह अनेक वर्षांची परंपरा आहे. मंडप उभारणीसाठी काही ठिकाणी रचनेच्या दृष्टीने खड्डे खोदणे गरजेचं असतं. अशावेळी इतक्या मोठ्या दंडामुळे त्यांच्यावर आर्थिक ओझं येणार आहे. याच मुद्द्यावर काही मंडळांनी महापालिकेशी चर्चा करण्याचा आणि निर्णय मागे घेण्याची मागणीही केली आहे.

खड्डा विरहित मंडप उभारणीवर भर द्यावा

रस्ते व पदपथावर खड्डा विरहित मंडप उभारणीकरिता प्रभावी तंत्र उपलब्ध आहे. या तंत्राचा उपयोग करून श्रीगणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारावेत, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नम्र आवाहन करण्यात येत आहे. मंडप उभारताना खड्डा खणल्याचे आढळल्यास संबंधित मंडळांकडून रस्त्याच्या पुनर्बांधणीचा खर्च व दंड याकरिता प्रति खड्डा प्रमाणे रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाइन एक खिडकी प्रणाली सुरू

सगळ्यांचा आवडता 'श्रीगणेशोत्सव' महाराष्ट्र शासनाने यावर्षापासून "महाराष्ट्राचा राज्य उत्सव" म्हणून घोषित केला आहे. मुंबईतील श्रीगणेशोत्सव उत्साहाने व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्याचे नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Morcha : मुंबईत विनापरवानगी 'सत्याचा मोर्चा' काढणं भोवलं, मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल
Women's World Cup Final: महिला वन डे विश्वचषक फायनल,पाऊस थांबला, सामना लवकरच सुरू
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून मालेगावात तुफान राडा, दोन गटांमध्ये थेट गोळीबार!
Yavatmal Truck Accident: चंद्रपूरहून Cement घेऊन येणारा ट्रक दुकानात घुसला, थरार CCTV'त कैद
Pothole Menace: पुणे-बंगळूर महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात, दुचाकी घसरल्याचा थरारक Video समोर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
Nashik Politics: पहिल्यांदा भाजपकडून रेड कार्पेट अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तत्काळ हकालपट्टी; नाशिकमध्ये काय घडतंय?
पहिल्यांदा भाजपकडून रेड कार्पेट अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तत्काळ हकालपट्टी; नाशिकमध्ये काय घडतंय?
Embed widget