एक्स्प्लोर
जुहूच्या पॉश परिसरातील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा
अभिनेता ऋत्विक रोशन, भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा, खासदार हेमा मालिनी, हॉटेल उद्योजक विकी ओबेरॉय अशा अनेक व्हीआयपींच्या घराच्यासमोरील फूटपाथवर केलेल्या अतिक्रमणांवर पालिकेने हातोडा चालवला
मुंबई : जुहूच्या पॉश परिसरातील अतिक्रमणांवर मुंबई महापालिकेने कारवाई करण्यास सरुवात केली आहे. विशेष म्हणजे यातून बॉलिवूड कलाकार आणि उद्योजकांची अतिक्रमणंही सुटू शकली नाहीत. या कारवाईला काल (शुक्रवार) पासून सुरुवात झाली.
अभिनेता हृतिक रोशन, भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा, खासदार हेमा मालिनी, हॉटेल उद्योजक विकी ओबेरॉय अशा अनेक व्हीआयपींच्या घरासमोरील फूटपाथवर केलेल्या अतिक्रमणांवर पालिकेने हातोडा चालवला.
जुहूतील फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या 60 जणांना मुंबई महापालिकेने 20 ऑगस्टला नोटिसा धाडल्या होत्या. तसेच त्यांना अतिक्रमण 48 तासात हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र 10 दिवस उलटूनही कोणीही हे अतिक्रमण न हटवल्याने पालिकेने कारवाई सुरु केली.
यापूर्वीही जानेवारी महिन्यात ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या 'रामायण' या घरातील अनधिकृत बांधकामावर बीएमसीने हातोडा चालवला होता. तर कॉमेडियन कपिल शर्मा आणि अभिनेता इरफान खान यांच्या घरातील अनधिकृत बांधकामावरही पालिकेने हातोडा मारला आहे.
संबंधित बातम्या
शत्रुघ्न सिन्हांच्या घरातील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement