एक्स्प्लोर
Advertisement
उल्हासनगरच्या महापौरपदी भाजपच्या पंचम कलानी
तब्बल एक तपानंतर उल्हासनगर शहरावर कलानी परिवाराचं वर्चस्व स्थापन झालं आहे.
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या पंचम कलानी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे तब्बल एक तपानंतर उल्हासनगर शहरावर कलानी परिवाराचं वर्चस्व स्थापन झालं आहे.
पंचम कलानी या माजी आमदार पप्पू कलानी आणि विद्यमान आमदार ज्योती कलानी यांच्या सूनबाई आहेत. भाजपकडून त्यांना उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. तर विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेने साई पक्षाच्या फुटीर उमेदवार ज्योती बठिजा यांना समर्थन दिलं होतं. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.
ऐनवेळी ज्योती बठीजा यांनी उमेदवारी मागे घेतली आणि पंचम कलानी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे एक तपानंतर उल्हासनगर महापालिकेवर कलानी परिवाराचं वर्चस्व स्थापन झालं आहे.
सर्व पक्षांना सोबत घेऊन उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं या निवडणुकीनंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि महापौर पंचम कलानी यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
राजकारण
क्राईम
Advertisement