एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भाजप राज्यभर ‘ओबीसी हक्क परिषद’ घेणार, नवमतदारांसाठी ‘युवा वॉरिअर’ स्थापन करणार : आशिष शेलार

भाजपतर्फे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये ओबीसी हक्क परिषद घेणार असल्याची माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली. तसंच नवमतदारांसाठी 'युवा वॉरिअर' स्थापन करणार असल्याचंही ते म्हणाले.

मुंबई : येत्या काळात भाजपतर्फे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये ओबीसी हक्क परिषद घेणार असल्याची माहिती भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिली. सोबतच नवमतदारांशी संपर्क साधून त्यांचे 'युवा वॉरिअर' असं नवं संघटन उभारलं जाणार असल्याचंही शेलार यांनी सांगितलं. महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या दोन दिवसीय योजना बैठकीबाबत आज आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि केंद्रातील 40 हून अधिक नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आशिष शेलार यांच्या माहितीनुसार, "येणाऱ्या काळात पक्षाची वाटचाल, विस्तार, विविध आघाड्यांच्या माध्यमातून पक्षाची वाढ, आगामी नगरपरिषदा, महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळावं म्हणून रणनिती निश्चित करणं, राज्यातील तीन सत्ताधारी पक्षाविरोधात एक भाजप असा सामना झाला तरी निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश कसं मिळेल, शतप्रतिशत भाजपाच्या यशाची सविस्तर चर्चा, नियोजन आणि योजना या बैठकीत निश्चित करण्यात आलं. तसंच महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि जनतेच्या प्रश्नांसाठी भाजपने करावयची आंदोलनं याबाबतचं नियोजन या बैठकीत करण्यात आल्याचं शेलार यांनी सांगितलं.

ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू नीट न मांडल्याने आरक्षणाला नख लागलं. आता ओबीसी समाजाला आणि ओबीसी घटकाला घटनेने मिळालेल्या आरक्षणाला धक्का लावण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री भूमिका घेत आहेत, असा आरोप शेलार यांनी केला. ओबीसी घटकाला संविधानाने दिलेल्या आरक्षणासाठी राज्यातील 36 जिल्ह्यामंध्ये भाजपाकडून ओबीसी हक्क परिषद घेण्याचा निर्णय या बैठकीत घेतल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं.

'सामना'चा अग्रलेख म्हणजे धडकी भरल्याची लक्षणं : आशिष शेलार धडकी मनात भरल्यावर माणूस कसा वागू शकतो याचा प्रत्यय 'सामना'च्या अग्रलेखातून आल्याचं आशिष शेलार म्हणाले. "मत आमच्याकडून मिळवली सलगी मात्र राष्ट्रवादीशी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून मत मिळवायची आणि मग काँग्रेसच्या दरबारात जायचे. हिंदूत्वाची भाषा करुन पहिले मंदिर, बाद में सरकार असं म्हणायचे आणि सत्तेत आल्यावर मंदिर विसरायचे, असे ज्यांचे दुटप्पी धोरण आहे अशांच्या मनात धडकी भरते आणि डंके की चोट पर म्हणायची त्यांची लायकी उरते का? हा प्रश्न निर्माण होतो अशा शब्दांत 'सामना'च्या अग्रलेखावर टीका केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Embed widget