एक्स्प्लोर

Mumbai Land Scam: वांद्रे भूखंड व्यवहाराची एसआयटी चौकशी करा; दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mumbai Land Scam : वांद्रे येथील भूखंड विक्रीच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Shivsena Vs BJP : मुंबईतील वांद्रे येथील बँड स्टॅण्डजवळील भूखंड विक्रीच्या व्यवहाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. याबाबत दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. गुरुवारी भाजप नेते आशिष शेलार यांनी या भूखंड विक्रीवरून सरकारला लक्ष्य करत चौकशीची मागणी केली आहे.  

वांद्रे पश्चिम येथील बँड स्टॅण्ड या उच्चभ्रू ठिकाणाजवळ असणाऱ्या ताज हॉटेलच्या शेजारी समुद्र किनारी मोक्याच्या ठिकाणी एक एकर 5 गुंठे एवढा शासकीय मालकीचा भूखंड आहे. हा भूखंड रूस्तमजी विकासकाला कवडीमोल किमतीत देण्यात आला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या विक्री व्यवहाराला स्थगिती देऊन त्याची विशेष चौकशी पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. 

सन 1905 मध्ये एका धर्मादाय संस्थेला नर्सिंग होम बांधण्यासाठी हा भूखंड भाडेपट्ट्यावर देण्यात आला होता. मात्र, एवढ्या वर्षात संबंधित संस्थेने या जागेचा वापर केला नाही आणि हा भाडेपट्टा करार 1980 मध्ये संपला होता असे दरेकरांनी म्हटले. मुंबई विकास आराखडा 2034 नुसार या भूखंडावर Rehabilitation Centre असे आरक्षण दाखवण्यात आले आहे. विकास आराखड्यासाठी दाखवण्यात आलेल्या कारणासाठी या जागेचा वापर होणे आवश्यक होते व अटीनुसारच धर्मादाय संस्थेला भाडेपट्ट्याने हा भूखंड देणे नियमानुसार अपेक्षित होते. मात्र, संबंधित संस्थेने नियमबाह्य पद्धतीने हा भूखंड विकण्याची जाहिरात प्रसिद्ध केली असून शासनाने ही भूखंड विक्रीची परवानगी दिली असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. 

रुग्णसेवेसाठी असलेला हा भूखंड संबंधित संस्थेने रुस्तमजी या विकासकाला 234 कोटी रुपयांना विकला असून भूखंडाचा दर शासकीय रेडी रेकनरनुसार 324 कोटी रुपये आहे. तर, बाजारभावानुसार अधिक दर असल्याचा दावा दरेकर यांनी केला. 

या भूखंड विक्रीचे प्रकरण संशयित आणि अतिशय गंभीर असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले. खासगी विकासकाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी  अनेक अनियमितता, बेकायदेशीर कामे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget