एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपचे नेते हैदर आझमी यांची पत्नी रेश्मा खानला दिलासा, अटक झाल्यास जामिनावर सुटका करण्याचे हायकोर्टाचे आदेश
मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे नेते हैदर आझम यांची पत्नी रेश्मा खान या बांग्लादेशी नसून बिहारमधील इस्लामपूरच्या असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते हैदर आझम (Haidar Azam) यांची पत्नी रेश्मा खानला (Reshma Khan) मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai Highcourt) मंगळवारी अटकेपासून दिलासा दिला आहे. तसेच अटक झाल्यास रेश्मा यांना 25 हजारांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रेश्मा खाननं त्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. रेश्मा या एक बांग्लादेशी नागरिक असून बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा आरोप तिच्या विरोधात आहे.
न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यांनी मंगळवारी रेश्माच्या याचिकेवर सुनावणी घेत रेश्माला अटकेपासून दिलासा दिला आहे. त्याचवेळी रेश्माला याप्रकरणी सुरू असलेल्या तपास कार्यात सहकार्य करण्याचे तसेच तपास अधिकाऱ्यांनी चौकशीला बोलावल्यावर हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. रेश्माचे पारपत्र सकृतदर्शनी बनावट असल्याचं दिसून येत असून तिला पोलीस कोठडीची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयानं तिचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला होता. परंतु राजकीय सूडाने आणि आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी आपल्याविरोधात ही तक्रार केल्याचा दावा करून रेश्मानं अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, आपली पत्नी बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील इस्लामपूर गावातील रहिवासी आहे, असा दावा हैदर आझम यांनी रेश्मावरील या आरोपांनंतर केला होता.
हे ही वाचा-
- भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे यांना दिलासा, लघुवाद कोर्टाच्या निकालाविरोधात हायकोर्टात सुनावणी होणार
- Mumbai: चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवत शरीरसुखाची मागणी, नकार देणाऱ्या अभिनेत्रीचा फोटो केला व्हायरल
- अनिल देशमुखांच्यावतीनं जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण, गुरुवारच्या सुनावणीत ईडी मांडणार बाजू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
विश्व
राजकारण
Advertisement