Mumbai: चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवत शरीरसुखाची मागणी, नकार देणाऱ्या अभिनेत्रीचा फोटो केला व्हायरल
Mumbai: चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवत बंगाली अभिनेत्रीकडं शरीरसुखाची मागणी करणाऱ्या कास्टिंग काऊच दिग्दर्शकाला मालाड पोलिसांनी अटक केलीय.
![Mumbai: चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवत शरीरसुखाची मागणी, नकार देणाऱ्या अभिनेत्रीचा फोटो केला व्हायरल Mumbai Police: Casting director in Mumbai arrested for demanding ‘sexual favours’ Mumbai: चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवत शरीरसुखाची मागणी, नकार देणाऱ्या अभिनेत्रीचा फोटो केला व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/27/91639013f16e778b7fc2842af1d3b557_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai: चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवत बंगाली अभिनेत्रीकडं शरीरसुखाची मागणी करणाऱ्या कास्टिंग काऊच दिग्दर्शकाला मालाड पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांनी आरोपीला टिटवाळा परिसरातून अटक केलीय. आरोपीनं पीडिताला नेटफ्लिक्स वेब सीरीजमध्ये काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं तिचे काही विचित्र फोटो काढले होते. त्यानंतर हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडं शरीरसुखाची मागणी करू लागला. परंतु, अभिनेत्रीनं नकार देताच आरोपीनं तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.
ओमप्रकाश राजू तिवारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी आणि पीडिताची सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर आरोपीनं पीडिताला मुंबईतील एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये चित्रपट आणि मालिकांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवलं. पीडिता मुंबईत आल्यानंतर आरोपीनं पीडिताला वेब सीरिजमध्ये काम मिळवून देण्याचं बहाण्यानं तिच्याकडं न्यूड फोटोंची मागणी केली. मात्र, काही दिवसानंतर आरोपी पीडिताकडं शरीरसुखाची मागणी करु लागला. परंतु, पीडितानं नकार देताच आरोपीनं तिचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.
यानंतर पीडितानं आरोपीविरोधात मालाड पोलिसांत तक्रार दिली. पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. आरोपीविरोधात कलम (354) (a)(b) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. याआधीही महिलांना नोकरीचं किंवा लग्नाचं आमिष दाखवत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
हे देखील वाचा-
- दिवसाला विना मास्क फिरणाऱ्या 100 जणांवर कारवाई करा; पोलीस आयुक्तांचे मुंबई पोलिसांना टार्गेट
- मसाले विक्री करणारा बनला होता अस्थिरोगतज्ञ, वसईत बोगस डॉक्टरांची मालिका सुरुच
- फेसबुकवर सांगायचा चित्रपट दिग्दर्शक, पण होता घरगडी; नवोदित अभिनेत्रींना फसवणारा खंडणीखोर अटकेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)