एक्स्प्लोर
पनवेल कृ.उ.बा. निवडणूक, भाजपचा धुव्वा, सर्व जागा महाआघाडीला

पनवेल : पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला आहे. शिवसेना, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी या चार पक्षांनी बनलेल्या महाआघाडीने सर्वच्या सर्व 17 जागा जिंकल्याने भाजपवर मोठी नामुष्की ओढवली.
शेकापचे 17 पैकी 15 सदस्य निवडून आल्याने साहजिकच बाजार समितीवर शेकापचा झेंडा फडकणार आहे. भाजपाला एकही जागा जिंकता न आल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय.
लवकरच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूका होऊ घातल्यात. त्या पार्श्वभूमीवर भाजपसमोर महाआघाडीचं मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे येत्या काळात पनवेल महापालिका निवडणुकीची लढत रंगतदार होणार आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















