एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपच्या मुंबईतील 227 उमेदवारांकडून पारदर्शकतेची शपथ
मुंबई : मुंबई महापालिकेतच्या प्रचारात आता भाजपनंही भावनिक राजकारणास सुरुवात केली आहे. भाजपच्या सर्व म्हणजे 227 उमेदवारांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करत प्रचाराचा श्रीगणेशा केला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण देणाऱ्या या स्मारकाच्या अभिवादनानंतर उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली.
भाजपकडून मुंबई तोडण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप होतो आहे. तो दावा खोडून काढण्यासाठी भाजपनंही आता नव्या रणनीतीची सुरुवात केली.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या सर्व उमेदवारांचा मेळावा घेऊन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत या सर्वांना पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ देण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे मुंबईतील 227 उमेदवार हजर होते.
भाजपच्या 227 उमेदवारांनी घेतलेली शपथ जशीच्या तशी :
"आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनाकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून मी आज खरा मुंबईकर म्हणून शपथ घेतो की, मी मुंबई महापालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर मुंबईकरांना पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार देण्यास कटिबद्ध राहीन. मी माझी मालमत्ता व उत्पन्नाची माहिती दरवर्षी जाहीर करेन. मी मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत कार्यरत राहीन. जनतेला सदैव उपलब्ध राहीन. मी मुंबईकरांचा सेवक म्हणून काम करेन व प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी या भाजपाच्या ध्येय धोरणानुसार मुंबईकरांसाठी कार्यरत राहीन."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
करमणूक
राजकारण
Advertisement