एक्स्प्लोर

'बिहारमध्ये कोरोना संपला का?' निवडणूक जाहीर झाल्यानंतर संजय राऊत यांचा सवाल

बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहारमधील कोरोना संपला का असा प्रश्न विचारला आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित होणार आहेत.

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहारमधील कोरोना संपला का असा प्रश्न विचारला आहे. तसंच या निवडणुकीत सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा असावा यासाठी प्रयत्न केल्याची टीकाही राऊत यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले.

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिला टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यात सात नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 10 नोव्हेंबर रोजी या मतदानाचा निकाल घोषित होणार आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.

"....आणि निवडणुका रेटल्या जातील" निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, "देशाच्या राजधानीत कोरोनाच्या भीतीमुळे आम्ही संसदेचं अधिवेशन घेऊ शकत नाही आणि बिहारसारख्या राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बिहारमध्ये कोरोना संपला का? हे पाहावं लागेल. सरकारला, तिथल्या राज्यकर्त्यांना आणि निवडणूक आयोगाला वाटलं असेल की कोरोना संपला आणि आम्ही निवडणुका घेतोय तर त्यासंदर्भात तसं जाहीर व्हायला पाहिजे. हा सरकारने घेतलेला निर्णय आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असं सांगितलं जाईल आणि निवडणुका रेटल्या जातील.

देशातील परिस्थिती अभूतपूर्व आहे. लोकांना मदतीची गरज आहे. लोकांना बोटावर फक्त शाई लावून घ्यायची नाही. ऑनलाईन प्रचार, ऑनलाईन निवडणूक, ऑनलाईन मतदान यामधून निवडणुकीची सिक्रसी टिकेल का याचा विचार सर्वच राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे. निवडणूक घ्यायला ही योग्य परिस्थिती आहे का हाच प्रश्न आहे.

बिहारमधील मतदान हे पूर्णपणे जात आणि धर्मावर होतं. तिथे अनेकदा गरिबी हा सुद्धा मुद्दा नसतो. त्यांच्या सरकारविषयी सुप्त राग आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

Bihar Election Dates 2020: बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर, कोरोना काळातील निवडणुकीसंदर्भात आयोगाच्या मोठ्या घोषणा 

Bihar Election : कोरोना काळातील जगातील सर्वात मोठी निवडणूक बिहारची, 'या' आहेत गाईडलाईन्स

केंद्र-बिहार सरकारने सुशांत सिंह प्रकरण प्रचाराचा मुद्दा बनवला : संजय राऊत सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हा प्रचाराचा मुद्दा असावा यासाठी केंद्र आणि बिहार सरकार मिळून त्याच्या आत्महत्येचं राजकारण केलं. जनता दल युनायटेड या पक्षाने सुशांत सिंह राजपूतचे पोस्टर प्रचारात आणले आहेत. तुमच्याकडे विकासाचा मुद्दा नाही, कामाचे मुद्दे नाही, सुशासनचा मुद्दा नाही, म्हणून मुंबईचे मुद्दे जबदस्तीने प्रचारात आणले आहेत. या सगळ्या नाट्यामध्ये पडदा ओढण्याचं काम केलं त्यांनी राजीनामा दिला ते बक्समधून निवडणूक लढत आहेत. हे सगळं आधीच ठरलं होत, त्यानुसार हे नाट्य पुढे चाललं आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं काय झालं? सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास आता पुढे जाईल असं मला वाटत नाही. कारण आता सीबीआय कुठेच दिसत नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं काय झालं? सामना चित्रपटातील मारुती कांबळेचं काय झालं? तसंच आम्हाला म्हणजेच मुंबई, महाराष्ट्राच्या लोकांना बिहारच्या पोलिसांना, तिथल्या राज्यकर्त्यांना विचारावं लागेल सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं काय झालं?

Sanjay Raut PC | केंद्र आणि बिहार सरकारकडून सुशांतच्या मृत्यूचं राजकारण : संजय राऊत

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget