एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी मोठी चुरस
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी डॉ. रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर, नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. प्रमोद येवले, अमरावती विद्यापीठाचे डॉ. विलास सपकाळ यांच्यात मुख्य चुरस आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाला लवकरच नवे कुलगुरु मिळणार आहेत. 13 आणि 14 एप्रिल रोजी 32 जणांच्या मुलाखतीमधून डॉ.कस्तुरीरंगन समितीने अंतिम पाच जणांची निवड केली आहे. त्या पाच जणांच्या मुलाखती कुलगुरुंकडून पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे कुलगुरुपदी नक्की कुणाची वर्णी लागेल हे शुक्रवारी (20 एप्रिल) स्पष्ट होईल असा अंदाज आहे.
डॉ. रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर, नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. प्रमोद येवले, अमरावती विद्यापीठाचे डॉ. विलास सपकाळ यांच्यात मुख्य चुरस आहे.
डॉ. संजय देशमुखांच्या काळात मुंबई विद्यापाठीत अनेक निकालांचा बोजवारा उडाला. यानंतर देशमुखांना कुलगुरुपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. त्यामुळे गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून मुंबई विद्यापीठाला कुलगुरुच नाहीत. त्यामुळे आता कुलगुरुपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अल्प परिचय :
डॉ विलास सपकाळ, (रसायनशास्त्र विभाग प्रमुख, अमरावती)
शिक्षण : एम टेक, पीचडी, रसायनशास्त्र,आयआयटी पवई, मुंबई
इंडस्ट्रियल रिसर्च अनुभव : केमिकल, फार्मसिटीकल, फूड अँड बायोटेक्नॉलॉजी फॉर टेक्निकल डेव्हलपमेंट अँड ट्रान्सफर
अनुभव : अकॅडेमिक, रिसर्च आणि प्रशासकीय अनुभव, गेली 15 वर्ष प्राध्यापक आणि विभागप्रमुख, रसायनशास्त्र विभाग, अमरावती विद्यापीठ
डॉ प्रमोद येवले (प्रकुलगुरु, नागपूर विद्यापीठ)
शिक्षण : एम फार्म, पुणे विद्यापीठ, पीचडी फार्मसिटीकल सायन्स (नागपूर विद्यापीठ)
अनुभव : प्र कुलगुरु नागपूर विद्यापीठ म्हणून काम, याआधी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च , वर्धा येथे प्राचार्य आणि प्राध्यापक काम
अनुभव : अकॅडेमिक, रिसर्च आणि प्रशासकीय अनुभव, गेली 15 पेक्षा अधिक वर्ष प्राध्यापक आणि प्राचार्य आणि प्र कुलगुरु अमरावती विद्यापीठाचा अनुभव
डॉ. सुहास पेडणेकर (प्राचार्य, रुईया महाविद्यालय, मुंबई)
शिक्षण : पीएचडी इन ग्रीन केमिस्ट्री ,स्टिव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, यूएसए
अनुभव : 28 वर्षापेक्षा प्राध्यापक, रिसर्चर, गाईड, प्राचार्य म्हणून काम. 2012 सालचा महारष्ट्र सरकारच्या बेस्ट टीचर पुरस्काराने सन्मान, टाटा केमिकल लिमिटेड कडून 'बेस्ट केमिस्ट्री टीचर 'म्हणून सन्मान
उच्च शिक्षण समितीत वेगवेगळ्या स्तरावर प्रशासकीय कामाचा अनुभव.
इंडियन केमिकल सोसायटी, इंडियन सायन्स काँग्रेस आदी संस्थांचे सदस्यत्व
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement