एक्स्प्लोर
छगन भुजबळांची अँजिओग्राफी जे. जे. हॉस्पिटलमध्येच होणार
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची अँजिओग्राफी जे. जे. रूग्णालयातच होईल, असे विशेष ईडी न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात भुजबळ यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर न्यायालयाने त्यांना रूग्णालयातून आर्थररोड कारागृहात नेण्याचे आदेश दिले. त्यावेळी भुजबळ यांनी अँजिओग्राफी करण्यास नकार दिला.
अँजिओग्राफी करण्याबाबत भुजबळ कुटुंबियांनी निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले. छगन भुजबळ यांची अँजिओग्राफी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये करावी, असे भुजबळ कुटुंबियांचे म्हणणे असल्याचे अॅड. शालाब स्नसेना यांनी न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने याचा निर्णय राखून ठेवला. मंगळवारी न्यायालयाने भुजबळ कुटुंबियांचे म्हणणे अमान्य केले. छगन भुजबळ यांची अँजिओग्राफी जे. जे. रूग्णालयातच होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाच्या निर्णयाची प्रत आम्हाला मिळालेली नाही. प्रत मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे अॅड. स्नसेना यांनी सांगितले. सुमारे 870 कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने गेल्यावर्षी भुजबळ यांना अटक केली. सध्या ते आर्थररोड कारागृहात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अर्थ बजेटचा 2025
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
अर्थ बजेटचा 2025
Advertisement