एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhiwandi Building Collapse Live Updates | विजय वडेट्टीवार यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी
भिवंडीमध्ये तीन मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत दहा जणांचा मृ्त्यू झाला आहे . तर ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
LIVE
Background
भिवंडी : भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांची सुखरुप सुटका करण्यात आलं. त्यांना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. रविवारी (20 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड इथली ही तीन मजली जीलानी इमारत पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून दुर्घटना घडली. रात्रीची वेळ असल्याने सर्व कुटुंबीय घरात झोपलेले असताना ही दुर्घटना घडल्याने, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे मृतांमध्ये सर्वाधिक लहान मुलं आहेत.
13:24 PM (IST) • 22 Sep 2020
13:06 PM (IST) • 22 Sep 2020
भिवंडीत इमारत दुर्घटनेला 32 तास उलटून गेले असून बचावकार्य अजूनही सुरु आहे. या इमारत दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी आपत्ती मदत पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार आले होते. त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला तसेच येथील मनपा आयुक्त पंकज आशिया आणि प्रांत अधिकारी तसेच एनडीआरएफ टीमच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. इमारत कोसळण्यामागचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेतलं. वडेट्टीवार यांनी सांगितले की जर ही इमारत लीगल असेल तर मृतांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत देखील करण्यात येईल तसेच जखमींना पन्नास हजार रुपये देखील जाहीर करण्यात आलं. शिवाय इमारत कोसळण्यामागे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. मात्र 35 वर्षात खरंतर इमारत कोसळायला नको होती, परंतु इमारत कोसळली आहे. त्यामुळे नोटीस देऊन देखील त्यांना इमारत रिकामी का केली नाही याचीही चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार येईल, असं त्यांनी सांगितलं. इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग असल्याने त्याच्या व्हायब्रेशनमुळे हा प्रकार घडला नाही ना किंवा या इमारतीमध्ये ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित नसल्याने इमारत कोसळली आहे का या सर्व गोष्टींची चौकशीही केली जाईल. भिवंडी इमारत दुर्घटना संदर्भात कॅबिनेटमध्ये बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढला जाईल. सध्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच अटक होणार असल्याचे त्यांनी सांगितला आहे.
08:26 AM (IST) • 22 Sep 2020
08:16 AM (IST) • 22 Sep 2020
भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं आहे. बचावकार्यादरम्यान रात्री सात मृतदेह बाहेर काढले. परिणामी मृतांचा आकडा 20 वर पोहोचला आहे.
18:44 PM (IST) • 21 Sep 2020
भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 12 वर; बचावकार्य सुरुचं
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement