एक्स्प्लोर
संभाजी भिडेंना अटक न केल्यास विधानभवनाला घेराव : प्रकाश आंबेडकर
संभाजी भिडेंना 8 दिवसांत अटक न केल्यास विधानभवनाला घेराव घालू अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी सरकारला अल्टिमेटम दिलं आहे. संभाजी भिडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठिशी घालत आहेत असा घणाघाती आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मुंबई : संभाजी भिडेंना 8 दिवसांत अटक न केल्यास विधानभवनाला घेराव घालू अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी सरकारला अल्टिमेटम दिलं आहे. संभाजी भिडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठिशी घालत आहेत असा घणाघाती आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. संभांजी भिडे यांच्या अटकेसाठी प्रकाश आंबेडकरांनी सरकारला 8 दिवसांचं अल्टीमेटम दिलं आहे. सरकारने भिडेंना 8 दिवसात अटक न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. संभाजी भिडेंवर कारवाई झाली नाही तर कुठल्या शेपटीवर पाय द्यायचा, कोणतं प्रकरण कधी काढायचं हे आपल्याचा चांगलं ठावूक असल्याचा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. एल्गार मोर्चातील आपल्या भाषणात काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? भीमा कोरेगाव प्रकरणात आकडे नाही मिळाले याबाबत मुख्यमंत्र्यांना मारलं पाहिजे, ही रावसाहेब पाटीलची फेसबुक पोस्ट होती. त्यावर संभाजी भिडेंचा फोटो होता. म्हणजेच तो भिडे यांचा समर्थक होता, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. संभाजी भिडे यांच्यावर जर कारवाई होऊ शकत नाही, तर पोलीस स्टेशन बरखास्त केलं पाहिजे. जर पोलीस स्टेशनवर कारवाई होईल आणि त्याद्वारे संभाजी ब्रिगेडवरही कारवाई होईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. कोरेगाव-भीमा प्रकरणात संभाजी भिडे आरोपी नंबर 1 आणि मिलिंद एकबोटे आरोपी 2 आहेत. जर 2 नंबरच्या आरोपीवर कारवाई होते तर 1 नंबरच्या आरोपीवर का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सरकारने न्यायाधीशाचं काम सोडून काम केलं पाहिजे, असंही ते पुढे म्हणाले. येत्या 8 दिवसात सरकारने भिडेंवर कारवाई करावी. ज्याने मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली त्यालाही अटक करावी, ज्यामुळे भिडेवर कारवाई होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 307 चा गुन्हा एकावर लागला आहे, मग दुसऱ्यांना का अटक नाही? जर संभाजी भिडे यांना अटक नाही केली, तर अनेकांना ते भय राहणार नाही. त्यामुळे भीमा-कोरेगावचा डाग निघण्यासाठी सरकारने संभाजी भिडे यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. कोरेगाव- भिमा हिंसाचाराचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीसाठी आज मुंबईत भारिपकडून एल्गार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात काढण्यात येणाऱ्या या रॅलीला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. मात्र तरीही रॅली काढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. दोन महिन्यांपासून मोर्चाची सूचना देऊनही सरकार भिडेंना पाठीशी घालतंय. शिवाय आंबेडकरी जनतेला दडपण्यासाठी पोलिसांच्या बळाचा वापर केला जात आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. भायखळा ते विधीमंडळ अशा एल्गार मार्चचं आयोजन आंबेडकरांनी केलं होतं. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं आंदोलक आझाद मैदानावर एकत्र आले आहेत. लाईव्ह अपडेट :
- मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रकाश आंबेडकरांना चर्चेचं निमंत्रण, एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार
- या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्तक्षेप, प्रकाश आंबेडकरांचा आरोप
- प्रकाश आंबेडकर आझाद मैदानावर दाखल
- एल्गार मोर्चामुळे दक्षिण मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी
- सीएसएमटी स्थानकाजवळ आंदोलकांची गर्दी, दंगल नियंत्रण पथक तैनात
सरकारने लोकशाहीचा गळा दाबला : प्रकाश आंबेडकर
आणखी वाचा























