भाईंदरची नवरी, जर्मनीचा नवरा! 24000 किमी अन् 155 दिवस बाईकनं प्रवास; अविस्मरणीय हनिमून ट्रिप
भाईंदरच्या जैसल पार्कमध्ये राहणारी मेधा रायने आपल्या जर्मन पतीसह लग्नानंतर 24000 किमी अन् 155 दिवस बाईकनं प्रवास केला.
Germany to India Bike Riding : भाईंदरच्या जैसल पार्कमध्ये राहणारी मेधा रायने आपल्या जर्मन पतीसह लग्नानंतर 24000 किमी अन् 155 दिवस बाईकनं प्रवास केला. त्यांनी जर्मनीहून बाईक प्रवास सुरु केला होता तो भाईंदरमध्ये संपला. मेधाच्या घरी पोहोचल्यावर मेधाचे वडील आणि सोसायटीतील लोकांनी भारतीय परंपरेनुसार मेधा आणि हॉके (Hauke) यांचं जंगी स्वागत केलं. मेधा आणि होके यांना जर्मनीहून भारतात पोहोचण्यासाठी तब्बल 155 दिवस लागले.
155 दिवस आणि 24000 किमी प्रवास, तोही बाईकने.. होय जर्ननीचा नवरदे आणि भाईंदरची नवरी या नवजोडप्याने आपलं हनिमुन एन्जॉय करण्यासाठी बाईक ट्रिप निवडली. जर्मनीत राहणा-या हॉके मिडे आणि भाईंदरमधील राहणारी मेधा रॉय यांचं मार्च महिन्यात लग्न झालं.. मेधाचं इंजिनअरिंगचं शिक्षण मुंबईत झालं आणि उच्च शिक्षणासाठी ती जर्मनी गेली. जर्मनीतून तिने उच्च शिक्षण घेतलं. तेथे ती सात वर्ष राहिली. आणि हॉके बरोबर मैञी होवून, तिने लग्न केलं. मेधाच्या लग्नात मेधाचे आई वडिल कोरोनामुळे जर्मनीला जावू शकले नाहीत. त्यामुळे जर्मनीचा जावई बापू आणि मुलीने आपलं हनिमून बाईक राईड द्वारे करायचं ठरवून, जर्मनीहून थेट भाईंदर गाठून आई वडिलांना भेटायचं ठरवलं. आणि मग काय 155 दिवसात भारतासह 19 देशांची सफर करत 24000 किमीचं अंतर पार करत त्यांनी शनिवारी भाईंदर गाठलं आणि त्यांच्या स्वागातासाठी मेधाचे आई-वडिल आणि सोसायटीतील लोकही होते.
मेधाने आणि तिच्या पतीने उत्तर ध्रुवमधून आपली सफर सुरु केली. या प्रवासासाठी दोघांनी बीएमडब्लू कंपनीच्या दोन बाईक घेतल्या होत्या. त्यांना 19 देशातील लोकांचा चांगला अनुभव आला. इरान, टर्की, पाकिस्तान या देशातून ही ती आली. तेथे भारतीय असल्याच लोकांना समजल्यावर लोकांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं. पाकिस्तानात बॉर्डर पर्यंत सोडण्यासाठी पाकिस्तानचा पायलेट स्कॉड होता. पाकिस्तान विषयी अनुभव सांगताना मेधा म्हणते की, पाकिस्तानी लोकांनी तर तीन वेळा चहा पाजला. आणि म्हटलं चहा तर पिया नाहीतर भारताचे लोक आम्हाला म्हणतील आमच्या मुलीला चहाचं पाजला नाही. पती हॉकसह जर्मनीहून भारतात आलेल्या मेघा राय, तिचे पालक आणि तिच्या सोसायटीतील लोकांनी केलेले स्वागत पाहून खूप आनंद झाला.
मेधाच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या लोकांमध्ये मेघाच्या शाळेतील शिक्षकही उपस्थित होत्या. मेधा भाईंदरच्या सेंट झेवियर्स शाळेत शिकली, मेधाच्या शिक्षिकेने मेधाबद्दल बोलताना सांगितले की, तिला तिच्या विद्यार्थ्याचा अभिमान आहे. मेधासोबत लग्न केल्यानंतर भारतात आलेला हॉक येथील लोकांचे प्रेम पाहून खुश होता. प्रवासात खूप चांगली लोकं भेटली. जीवनातील एक अविस्मरणीय प्रवास झाल्याचं ह़ॉके यांनी सांगितलं.