(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बेस्टचा संप : टॅक्सीचालकांची मुजोरी, एसटी मुंबईकरांच्या मदतीला
वेतनवाढ, वेतननिश्चिती तसेच बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिका 'अ' अर्थसंकल्पात विलिनीकरण यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.
बेस्ट कर्मचारी संपावर
वेतनवाढ, वेतननिश्चिती तसेच बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिका 'अ' अर्थसंकल्पात विलिनीकरण यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. संप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार संघटना यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरली. या बैठकीला बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनीच हजेरी लावली नाही.
लोकल रेल्वेनंतर 'बेस्ट' बस हा मुंबईकरांच्या प्रवासाचा दुसरा मोठा पर्याय आहे. मात्र गेली अनेक वर्ष बेस्ट संकटात आहे. बेस्टला मुंबई महापालिकेकडून आश्वासनं मिळतात पण ती पूर्ण होताना दिसत नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बेस्टला आश्वासन दिलं होतं ते ही पूर्ण केलं नाही. त्यामुळे कामगारांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या
- बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे - 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी - एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे - 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस - कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा - अनुकंपा भरती तातडीनं सुरु करावी