एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बेस्ट समिती अध्यक्षांनाच कर्मचाऱ्यांच्या वेदनेचा विसर?
मुंबई : मुंबई महापालिकेत आजचा दिवस बेस्ट कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारावरुन गाजला. बेस्ट कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळालेला नाही, तर दुसरीकडे बेस्ट कर्मचाऱ्यापासून समितीचे अध्यक्ष झालेल्या अनिल कोकीळ यांनाच, कर्मचाऱ्यांच्या वेदनेचा विसर पडला की काय, असा सवाल विचारला जात आहे.
बेस्टचे माजी कर्मचारी अनिल कोकीळ मुंबई महापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले आणि पहिल्याच बैठकीत भाजप आणि काँग्रेसने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा मुद्दा लावून धरला.
बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या शिवसेनेनेच्या कोकीळ यांनी पगार होईपर्यंत सत्कार स्वीकारणार नसल्याची घोषणाही केली. मात्र अर्ध्या तासात अनिल कोकीळ यांना त्यांच्याच घोषणेचा विसर पडला. बेस्ट भवनात जंगी कार्यक्रमात त्यांनी सत्कार स्वीकारला आणि इकडे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं.
आता कर्मचाऱ्यांच्याच पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने विरोधकांनी पेंग्विनचा मुद्दा काढून शिवसेनेवर शरसंधान साधलंय. मुंबई महापालिकेने बेस्ट बजेटकडे पाठ फिरवली आहे. पेंग्विनसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
काय आहे बेस्टची परिस्थिती?
मुंबई महापालिकेची बँकेत 61 हजार कोटींची ठेवी आहे. मात्र 84 कोटींच्या अभावी 42 हजार कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत.
बेस्टचं वार्षिक उत्पन्न 486 कोटी आहे आणि आणि खर्च 688 कोटी रुपये आहे. बेस्टने 1600 कोटींचं कर्ज मुंबई महापालिकेकडून घेतलं आहे. बेस्टवर बँकांच्या 975 कोटींच्या कर्जाचीही थकबाकी आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारावर महिन्याला 84 कोटी 63 लाख खर्च होतात. बेस्टवर 2016-17 मध्ये 960 कोटींचा तोटा तर, चालू वर्षात हा तोटा 1067 कोटींवर जाऊ शकतो.
फेब्रुवारीच्या थकीत पगारासाठी 24 तारीख देण्यात आली आहे. मात्र त्यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याच्या सणाला तरी पगार मिळणार का, याबाबत साशंकता आहे. निवडणुका झाल्या, पुन्हा सत्ताधारीच सत्तेत बसले, मात्र कर्मचाऱ्यांचे प्रश्न सध्या तरी कायम आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
राजकारण
नाशिक
Advertisement