एक्स्प्लोर
Advertisement
IND vs PAK : महामुकाबल्यावर तब्बल 10 हजार कोटींचा सट्टा लागणार, बुकींची माहिती
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफिच्या फायनलसाठी उद्या भारत आणि पाकिस्तानचा संघ ओव्हल मैदानावर भिडणार आहे. मात्र सामना सुरू होण्यापूर्वी आणि सामना सुरू झाल्यानंतर सट्टेबाजांचे फोन खणखणायला सुरूवात होणार आहे. उद्याच्या भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यावर तब्बल 10 हजार कोटींचा सट्टा लागणार असल्याची माहिती बुकींनी दिलीय.
आतापर्यंत 4 ते 5 हजारांचा सट्टा लागला असून सामना सुरू झाल्यानंतर हा आकडा चांगलाच वाढेल, अशी बुकींची माहिती आहे. सट्ट्याच्या बाजारात भारताचं पारडं जड असल्याचं समजतं आहे.
बुकींकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्याच्या सामन्यात भारत जिंकला तर 1 रुपयाचा सट्टा लावणाऱ्याला दीड रुपये मिळणार आहेत. तर पाकिस्तान जिंकला तर 1 रुपयाचा सट्टा लावणाऱ्यास 3 रुपये मिळणार आहेत.
तर या सामन्यात नाणेफेक भारतानं जिंकल्यास 1 रुपयाचा सट्टा लावणाऱ्याला 1 रुपये 72 पैसे मिळतील. तर पाकिस्ताननं टॉस जिंकल्यास 1 रुपयाचा सट्टा लवाणाऱ्याला 2 रुपये 33 पैसे मिळतील.
या शिवाय कर्णधार विराट कोहली आणि अझर आलीवरही सट्टेबाजांचं विशेष लक्ष्य आहे. उद्याच्या सामन्यात विराट कोहलीनं सर्वाधिक धावा केल्यास 1 रुपयामागे 2 रुपये 33 पैसे मिळणार आहेत. तर अझर अलीनं सर्वाधिक धावा केल्यास 3 रुपये 85 पैसे मिळणार आहेत.
यासोबतच रोहित शर्मानं सर्वाधिक धावा केल्यास 1 रुपयामागे 3 रुपये 89 पैसे मिळणार आहेत. तर शोएब मलिकनं सर्वाधिक धावा केल्यास 1 रुपयामागे 3 रुपये 93 पैसे मिळणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement