एक्स्प्लोर

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं आज भूमीपूजन

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गिरणगावातील 195 बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचं भूमीपूजन होत आहे. 1921 ते 1925 या कालावधीत या इमारती बांधण्यात आल्या आहेत. म्हणजेच बीडीडी चाळीने नव्वदी पार केली आहे. त्यामुळे अर्थातच बांधकामं जर्जर झालं आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या मागणीने जोर धरला होता. जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा हा देशातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत बीडीडी चाळीत 160 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्यांना 500 चौरस फुटांची घरं मिळणार आहेत. डिलाईन रोड, वरळी, नायगाव, शिवडी येथे ब्रिटीशकालीन 207 चाळी आहेत. त्यातील 194 चाळींच्या पुर्नविकासाचं भूमीपूजन आज होणार आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्री फडणवीसांनी अवघ्या अडीच वर्षात हिरवा झेंडा दाखवला असला, तरी याला काही संघटनांचा विरोध आहे. त्यामुळं हा विरोध पाहता, आजच्या कार्यक्रमात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बीडीडी चाळींची वैशिष्ट्ये
  • ब्रिटीश डेव्हलपमेंट डिपार्टमेंट या जमिनीचे मूळ मालक होते.
  • 95 वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन चाळी 1919 मध्ये बांधण्याचा निर्णय झाला.
  • 1923 पासून गिरण्यांमधील कामगार, रेल्वे कर्मचारी अशा श्रमिकांना या खोल्या भाडेकरू म्हणून राहण्यासाठी देण्यात आल्या.
  • किमान 6 रुपये ते कमाल 8 रुपये भाडे इतकं नाममात्र शुल्क या कामगारांना द्यावे लागत असे.
  • चाळींच्या देखभालीसाठी नंतर बॉम्बे इम्प्रूमेंट ट्रस्टची स्थापना झाली.
  • स्वातंत्र्यानंतर याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली.
  • वरळी, डिलाईल रोड, नायगाव आणि शिवडी या गिरणगावात मिल कामगार, रेल्वे कर्मचारी अशा श्रमिकांचं वास्तव्य असलेल्या चाळी.
  • मुंबईच्या केंद्रस्थानी असलेल्या 92 एकरात 207 बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रस्तावित आहे.
  • 4 मजली चाळीत प्रत्येक मजल्यावर 20 खोल्या अशा प्रत्येक इमारतीत एकूण 80 खोल्या आहेत.
  • 160 चौ. फुटांच्या खोलीत राहणाऱ्या साधारण 13 हजार चाळकऱ्यांना 500 चौ. फुटांची सदनिका मोफत मिळणार आहेत.
  • बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडाला नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात आले आहे.
  • विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्यात आले. डिलाईल रोड आणि नायगाव बीडीडीच्या पुनर्विकासासाठी जागतिक निविदा काढण्यात आल्या असून डिलाईल रोड येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम शापूरजी अॅन्ड पालोनजी या कंपनीला तर नायगांव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम एल अॅन्ड टी या कंपनीला देण्यात आले आहे.
  • वरळी प्रकल्पाची निविदा काढण्यात आली असून लवकरच तेथे बांधकाम करणारी ठेकेदार कंपनी जाहीर केली जाईल.
  • डिलाईल रोड येथे चाळकऱ्यांसाठी 23 मजली इमारती बांधण्यात येतील तर विक्रीसाठी 60 मजल्यांच्या इमारती बांधण्याचे प्रस्तावित आहे.
  • चाळकऱ्यांना टप्प्याटप्प्याने संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येणार आहे. डिलाईल रोड आणि नायगाव येथील पुनर्विकासाचा प्रकल्प सात वर्षांत पूर्ण होणार आहे.
संबंधित बातमी मुंबईतील श्रमिकांची कर्मभूमी आता इतिहासजमा होणार

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबईकरांनो सावधान! वातावरणात मोठा बदल, तापमानाचा पारा 38 अंशाच्या पुढे, हवामान विभागानं दिला इशारा
मुंबईकरांनो सावधान! वातावरणात मोठा बदल, तापमानाचा पारा 38 अंशाच्या पुढे, हवामान विभागानं दिला इशारा

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget