एक्स्प्लोर

आधी मर्सिडीजला धडक, पळून जाताना इतर गाड्याही उडवल्या; वांद्रे-वरळी सी-लिंकवरील अपघात प्रकरणी कार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Mumbai Sea Link Accident: वांद्रे वरळी सी लिंकवरील अपघाता प्रकरणी कारचालकाविरोधात सदोष मनुष्यवथाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालक मोहम्मद सरफराज शेख विरोधात भादंवि 304 (2) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bandra Worli Sea Link Accident: मुंबईतील (Mumbai News) वांद्रे-वरळी सी-लिंकवर (Bandra Worli Sea Link) गुरुवारी रात्री झालेल्या अपघाताप्रकरणी (Accident News) कार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Culpable Homicide) दाखल करण्यात आलाय. मोहम्मद सरफराज शेख असं चालकाच नावं आहे. कार रात्री वांद्रे-वरळी सीलिंकवर टोलनाक्याजवळ रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांना मागून भरधाव वेगात आलेल्या गाडीनं जोरदार धडक दिली. या अपघातात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला. अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची परिस्थित चिंताजनक आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

वांद्रे वरळी सी लिंकवरील अपघाता प्रकरणी कारचालकाविरोधात सदोष मनुष्यवथाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालक मोहम्मद सरफराज शेख विरोधात भादंवि 304 (2) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल नाक्यापासून 200 मीटर अंतरावर इनोव्हा गाडीनं मर्सिडीजला टक्कर दिली होती. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना टोल नाक्यावर थांबलेल्या वाहनांना ईनोव्हानं धडक दिली. ईनोवा गाडीतील तिघांचा मृत्यू झाला आहे. 

नेमकं काय घडलं? 

वरळीहून (Worli) वांद्र्याच्या दिशेनं भरधाव वेगात इनोव्हा कार जात होती. इनोव्हा कारमधून सहा प्रवासी प्रवास करत होते. ही इनोव्हा कार सर्वात आधी सी-लिंकवर मर्सिडीज गाडीला धडकली. त्यानंतर सुसाट वेगानं तिथून निघून गेली. पुढे जाऊन या कारनं वांद्रे सीलिंकवरील टोलनाक्यावर टोल भरत असलेल्या इनोव्हा आणि क्विड गाडीला पाठीमागून जोरदार धडक मारली. इनोव्हा गाडीच्या पाठोपाठ होंडा सिटी कारनंही इनोव्हा गाडीला धडक देत, वांद्रा-वरळी सी लिंकवरील टोल नाका 11 आणि 10 वरुन जाणाऱ्या टॅक्सिला धडक दिली. अचानक झालेल्या विचित्र अपघातामुळे सर्वजण पुरते घाबरले होते. 

वांद्रे वरळी सी लिंकवर झालेल्या विचित्र अपघातानंतर तात्काळ टोलनाक्यावर उपस्थित कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीनं सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तीन जणांना मृत घोषित करण्यात आलं. अपघातात हनिफ पिर, ,हमाबीबी पिर ,खतीजा हटिया या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, असीम सदर, ,हजरा सदर, बीबी सदर, राजश्री दवे, राकेश दवे, अशी जखमींची नावं आहेत. अद्याप सर्व जखमींची नावं कळू शकलेली नाही. सर्व जखमींवर मुंबईतील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून चौकशी सुरू आहे. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करतंय, आरक्षणाच्या मुद्यावरुन अबू आझमींचा हल्लाबोल
भाजप सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करतंय, आरक्षणाच्या मुद्यावरुन अबू आझमींचा हल्लाबोल
Rohit Pawar and Naresh Arora: माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय, कॅश बॉक्सवाल्यांनो 'रोक सके तो रोक लो', रोहित पवारांचा नरेश अरोरांवर हल्लाबोल
रोहित पवारांचा नरेश अरोरांना इशारा, म्हणाले, 'मला माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलंय, तुला किती पैसा....'
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर 'हा' नेता होणार होता प्रदेशाध्यक्ष; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर 'हा' नेता होणार होता प्रदेशाध्यक्ष; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
Raj Thackeray Meet Eknath Shinde मोठी बातमी: राज ठाकरे भेटीसाठी एकनाथ शिंदेंच्या घरी; राजकीय वर्तुळात खळबळ!
मोठी बातमी: राज ठाकरे भेटीसाठी एकनाथ शिंदेंच्या घरी; राजकीय वर्तुळात खळबळ!

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Gopichand Padalkar : मुलीवर जबरदस्ती करुन व्हिडिओ केला, पोलिसांना, घरच्यांना व्हिडिओ पाठवला म्हणजे त्यांचं धाडस वाढतंय, गोपीचंद पडळकरांचा आरोप
जनआक्रोश मोर्चापूर्वी मुलीचा व्हिडिओ समोर आला; मुलीवर जबरदस्ती करत व्हिडिओ तयार केला, गोपीचंद पडळकरांचा आरोप
Share Market Update: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
Crime News: दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
Satara : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय 
मकरंद पाटील- शंभूराज देसाईंंच्या भेटीत एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता येणार
Rohit Pawar and Naresh Arora: माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय, कॅश बॉक्सवाल्यांनो 'रोक सके तो रोक लो', रोहित पवारांचा नरेश अरोरांवर हल्लाबोल
रोहित पवारांचा नरेश अरोरांना इशारा, म्हणाले, 'मला माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलंय, तुला किती पैसा....'
Embed widget