एक्स्प्लोर

Bandra Railway Station Stampede Video : कुणाची मांडी फाटली, कोणाचा हात तुटला, प्लॅटफॉर्मवर रक्ताचा सडा; वांद्रे टर्मिनसच्या चेंगराचेंगरीचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ!

Bandra Railway Station Stampede : मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे थरारक व्हिडीओ समोर आले आहेत.

मुंबई : शहरातील वांद्रे टर्मिनसवर धक्कादायक घटना घडली आहे. येथे रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी (Bandra Railway Station Stampede Video) झाली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल एकूण 9 जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. दरम्यान, या घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये ही घटना किती गंभीर आहे, याची कल्पना केली जाऊ शकते. 

नेमकी घटना कशी घडली? 

मिळालेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीची ही घटना वांद्रे टर्मिनसवर घडली. सकाळी सहा वाजता हा प्रकार घडला. वांद्रे टर्मिसवरून पहाटे गोरखपूरला जाणारी रेल्वे लागते. ही रेल्वे पूर्णपणे अनारक्षित असते. म्हणूनच या रेल्वेला मोठ्या प्रमाणात प्रवाशी गर्दी करतात. प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला जाणारे प्रवासी या रेल्वेतून प्रवास करतात. दिवाळी आणि छट पूजा हे सण उत्तरेतील राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हे सण कुटुंबासोबत साजरे करावेत म्हणून मुंबईत कामाला आलेले उत्तर भारतीय या सणानिमित्त आपापल्या गावी जातात. गोरखपूरला जाणाऱ्या या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी असेच प्रवासी वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर गेले होते. मात्र ही रेल्वे उभी असलेल्या प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी झाली. 

पाहा व्हिडीओ :

कोणाची मांडी फाटली, कोणाचा हात तुटला

मिळालेल्या माहितीनुसार गोरखपूरला जाणाऱ्या या रेल्वेत बसण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. यावेळीच चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे चेंगराचेंगरीची ही घटना इतकी गंभीर होती, की जखमी झालेले प्रवाशांची स्थिती फारच हृदयद्रावक झाली आहे. जखमी झालेल्या प्रवाशांमधील एकाची तर थेट मांडी फाटली आहे. आणखी एका प्रवाशाचा हात तुटला आहे. चेंगराचेंगरीत काही प्रवाशांचे कपडेही फाटले आहेत. एका प्रावाशाच्या कंबरेला मार लागल्याचे दिसत आहे. ही चेंगराचेंगरी इतकी भीषण होती की प्रवाशांचे खूप सारे रक्त प्लॅटफॉर्मवर सांडलेले दिसत आहे. 

घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांची नावे काय? 

शबीर अब्दुल रेहमान
परमेश्वर गुप्ता
रविंद्र छुमा
रामसेवक रविंद्र प्रसाद प्रजापती
संजय कांगाय
दिव्यांशू यादव
मोहम्मद शेख
इंद्रजित शहानी
नूर शेख 

हेही वाचा :

Bandra Terminus Stampede : मोठी बातमी! वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, दोघांची प्रकृती गंभीर

मुंबई महानगरपालिकेत 31 वर्षे नोकरी, ठाकरे गटाकडून विधानसभेचं तिकीट, पण राजू तडवींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात

ऐन दिवाळीत प्रवाशांना दे धक्का, चिपी-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून बंद; नेमकं कारण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : देवेंद्र फडणवीस ते विधानसभा निवडणूक; मनोज जरांगेंची प्रतिक्रियाRaigad  District Vidhan Sabha Constituency 2024 : भरतशेठ गोगावलेंची मंत्रिपदाची इच्छापुर्ती होणार?Deepak Kesarkar : अमित ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं कर्तव्य, केसरकरांनी बातमी फोडली?Job Majha : युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? पात्रता काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
pimpri assembly constituency: पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
Embed widget