Bandra Crime : वांद्रे टर्मिनस येथे तरुणाला लव्ह जिहादच्या आरोपाखाली मारहाण, माजी आमदार वारीस पठाणांकडून मारहाणीचा व्हिडीओ शेअर
मुंबईत वांद्रे स्थानकाबाहेर तरूणीसाठी फिरायला गेलेल्या तरूणाला लव्ह जिहादचा आरोप करत जमावाने बेदम मारहाण केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुंबई : वांद्रे टर्मिनस येथे तरुणीसोबत बाहेर गेलेल्या तरुणाला लव्ह जिहादच्या (Love Jihad) आरोपाखाली मारहाण करण्यात आली आहे.लव्ह जिहादच्या आरोपाखाली तरुणाला मारहाण केल्याचा आरोप करत माजी आमदार वारीस पठाणांकडून (Waris Pathan) मारहाणीचा व्हिडीओ शेअर करण्यात आली आहे. वांद्रे पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी मुंबईत वांद्रे स्थानकाबाहेर तरूणीसाठी फिरायला गेलेल्या तरूणाला लव्ह जिहादचा आरोप करत जमावाने बेदम मारहाण केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये लाल शर्ट घातलेल्या तरुणीला जमावाकडून मारहाण होताना दिसत आहे. त्यावेळी तरूणाची मैत्रीण जमावाला विरोध करत आहे. व्हिडिओमधील तरुणाची मैत्रीणीने बुरखा घातला आहे. या घटनेत मारहाण झालेल्याव्यक्तीला गंभीर दुखापत झाल्यानंतर रेल्वे स्थानकाबाहेर ओढत नेले. त्यानंतर जमावाने 'जय श्री राम' च्या घोषणा देत जमाव त्या व्यक्तीला केस आणि कॉलर पकडून बाहेर ओढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वारीस पठाण यांनी टीका केली आहे. वारीस पठाण टीका करताना म्हणाले,मुंबईत अशी घटना घडते ही अतिशय लाजीरवाणी घटना आहे. मुंबई वांद्रे रेल्वे स्थानकावर लव्ह जिहादच्या नावाखाली जेएसआरचा नारा देणाऱ्या हिंदुत्ववादी गुंडांनी एका नि:शस्त्र मुस्लिम मुलाला निर्दयपणे मारहाण केली.तिथे आरपीएफचा कर्मचारी देखील उपस्थित होता, तरी देखील कोणतीही अॅक्शन घेण्यात आली नाही. कायदा हातात देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हा प्रकार घडत आहे. एवढा द्वेष कशासाठी? जर गुन्हा केला असेल तर पोलीस प्रशासन आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणाल नाही. माझी मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती आहे की, व्हिडीओमधील तरूणांनर कडक कारवाई करा, तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.
I have been informed that this incident happened around 21/22nd July. At Bandra railway station which comes under Nirmal nagar p stn. But video was viral on social media today Then what was police doing till date,why no investigation or complaint registered by police who was… https://t.co/8nsvYcE0Iy
— Waris Pathan (@warispathan) August 15, 2023
जानेवारीपर्यंत 152 आंतरधर्मीय विवाहांची माहिती
"महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त लव्ह जिहादची प्रकरणं समोर आल्याने कुठे ना कुठे समाज व्यथित आहे. जानेवारीपर्यंत राज्य सरकारच्या आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीला 152 आंतरधर्मीय विवाहांची माहिती मिळाली होती. समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून 152 प्रकरणे समोर आली आहेत. समितीचं नावं प्रसिद्ध झाल्यानंतर काही कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. बहुतांश प्रकरणांमधील सदस्यांनी सांगितलं की, त्यांचा त्यांच्या मुलांशी संवाद तुटला आहे. त्यांना संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याची किंवा समुपदेशन घेण्याची आवश्यकता होती," असं मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं होतं.