एक्स्प्लोर
बाळासाहेब ठाकरे स्मारक विधेयक संमत, सेनेचे मंत्री गैरहजर
मुंबई : बाळासाहेब ठाकरे स्मारक सुधारणा विधेयक विधानसभेत एकमताने संमत झालं आहे. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी महापौर बांगला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यासाठी मुंबई महापालिका सुधारणा विधेयक 2017 विधानसभेत सादर केलं आणि उपस्थित सर्व पक्षांनी एकमताने संमतही केलं.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं विधेयक संमत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भाजप, काँग्रेस अशा सर्व पक्षांनी पाठिंबा दिला.
विशेष म्हणजे शिवसेनेचे एकही मंत्री आणि आमदार विधानसभेत उपस्थित नव्हते. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी ही बाब लक्षात आणून दिली.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं विधेयक चांगलं आहे. मात्र, शिवसेनेचे मंत्री आणि आमदार का उपस्थित नव्हते, हे माहित नाही. पण भाजपने पाठिंबा दिला आहे. विधेयक एकमताने मंजूर झालं आहे, अशी माहिती भाजप आमदार राज पुरोहित यांनी दिली.
शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी प्रतोदांना धरलं धारेवर - सूत्र
महापौर बांगला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यासाठी मुंबई महापालिका सुधारणा विधेयक 2017 विधानसभेत संमत झालं. यावेळी शिवसेनेचे एकही मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधानसभेत गटनेते आहेत, तर मुख्य प्रतोद सुनील प्रभू आहेत. काल ठाण्याचा महापौर बसला, उद्या मुंबईचा बसणार आहे, यात शिवसेनेचे मंत्री आणि प्रतोद यांच्याकडून दुर्लक्ष झालं.
शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी प्रतोदांना धारेवर धरलं असून, मुंबईच्या आमदारांविषयीही नाराजी व्यक्त केली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. विधेयक जेव्हा यादीत होतं, तेव्हा ते आमदारांनी वाचणं अपेक्षित होतं, असं ज्येष्ठ मंत्र्यांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement