एक्स्प्लोर

Bala Nandgaonkar : राज ठाकरेंनी त्यावेळी रक्ताचं नातं जपलं, अजूनही वेळ गेली नाही; बाळा नांदगावकरांची उद्धव ठाकरेंना साद

Raj Thackeray :राज ठाकरे यांनी राजकारणाच्या पलिकडे नातं जपण्याचं काम केलं आहे, ते बाळासाहेबांप्रमाणेच हळवे आहेत असं बाळा नांदगावकर म्हणाले. 

मुंबई : आम्ही नाती जपली, पण राज ठाकरेंनी रक्ताचं नातं जपलं. आदित्य वरळीतून उभे होते त्यावेळी आपल्या घरातील व्यक्ती उभा आहे असं समजून राज ठाकरेंनी उमेदवार दिला नव्हता. पण अजूनही वेळ गेली नाही असं म्हणत मनसेचे शिवडीतील उमेदवार बाळा नांदगावकरांनी उद्धव ठाकरेंना साद घातल्याचं दिसून आलं. माहीमची उमेदवारी आधी आम्ही जाहीर केली, नंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर केली. उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंसमोर उमेदवार द्यायला नको होतं असंही ते म्हणाले.

बाळा नांदगावकर म्हणाले की, अमित ठाकरे यांच्यासमोर उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिलाच पण शिंदेंनींही दिला.  माहिमची आधी आम्ही उमेदवारी जाहीर केली. नंतर त्यांनी केली. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. शेवटी जे काही वैभव, मान-सन्मान आम्हाला मिळाला आहे ते याच ठाकरे कुटुंबामुळे मिळाला आहे. ते जपणं आवश्यक होतं. याबाबत विचार व्हायला हवा होता. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही.

बाळा नांदगावकर म्हणाले की, राज ठाकरे मनातून फार हळवे आहेत.अगदी बाळासाहेबांप्रमाणे ते आहेत. सगळे ठाकरे असेच आहेत. अमित ठाकरे निवडणूक लढवतील याबाबत खरंच कल्पना नव्हती. मात्र पक्षातील नेत्यांनी निवडणूक लढायला हवं असे मत त्यांनी मांडले. त्यानंतर निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू झाली. 

राज ठाकरेंच्या जे पोटात असतं तेच ओटात असतं, ते सडेतोड बोलतात. आम्ही नाती जपली पण त्यांनी खरचं रक्ताचं नातं जपलयं. आदित्य उभा होता तेव्हा ठाकरे घराण्यातला व्यक्ती उभा आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी उमेदवार दिला नाही. राजकारणाच्या पलिकडचं नातं जपण्याचं काम कायमच त्यांनी केलं. 

निवडणुकीच्या निकालानंतर जो सत्तेत बसेल तो आमच्याच पाठिंब्यानेच बसेल असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.

माहीममध्ये तिरंगी लढत

माहीम विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. मनसेकडून अमित ठाकरे निवडणुकीला उभे असून त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सदा सरवणकर यांनी अखेरपर्यंत त्यांचा अर्ज मागे घेतला नसल्याने ही रंगत तिरंगी होणार आहे. 

ही बातमी वाचा: 

 

                             

      

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
धक्कादायक! गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलानेच आईचे लाखो रुपयांचे दागिने चोरले, आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलानेच आईचे लाखो रुपयांचे दागिने चोरले, आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात
Rohit Pawar on NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यातून कोणीतरी घरभाडं अन् ब्युटी पार्लरचे पैसे दिले, अजितदादांना समजल्यावर संतापले, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यातून कोणीतरी घरभाडं अन् ब्युटी पार्लरचे पैसे दिले, अजितदादांना समजल्यावर संतापले, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget