(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनामुळे पाळीव प्राण्यांचे बुरे दिन; रस्त्यावर अनेक विदेशी श्वान बेवारस
कोरोनामुळे पाळीव प्राण्यांवर बुरे दिन आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील रस्त्यावर अनेक विदेशी श्वान बेवारस सोडल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई : जगभरात सध्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. अशावेळी प्रत्येक नागरिकानं स्वत:ची योग्य काळजी घेण्यासोबतच आपल्या कुटुंबियांचीही काळजी घेणं आवश्यक आहे. एरव्ही घरातील पाळीव प्राण्यांनाही आपण कुटुंब सदस्यांचाच दर्जा देतो, त्यांची काळजी घेतो. मात्र सध्या काही लोकांमध्ये पाळीव प्राण्यांच्याबाबतीत स्वार्थी वृत्ती आणि निष्काळजीपणा दिसून येत आहे. मुंबईत गेल्या तीन आठवड्यांत तब्बल 34 उच्च जातीच्या श्वानांना प्राणीमित्र संघटनेनं मुंबईच्या विविध स्त्यांवरनं रेस्क्यू केलं आहे. यात जर्मन शेफर्ड, लॅब्रेडॉर यांसारख्या अन्य जातींच्या श्वानांसह काही परदेशी मांजरींचाही समावेश आहे.
ठाणे एसपीसीए (सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुअल्टी टू अॅनिमल) यांच्या वतीनं अशा प्राण्यांची काळजी घेतली जात आहे. संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मजुमदार आणि प्राणीप्रेमी नंदिता सहगल यांच्या पुढाकारानं मालकांनी टाकलेल्या अश्या पाळीव प्राण्यांवर उपचार करून त्यांना तात्पुरता निवारा मिळवून दिला जातो. तसेच दत्तक योजनेतून त्यांना एक सुरक्षित असं नवं घर मिळवून देण्याचाही प्रयत्न केला जातो असं नंदिता सहगल यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. त्यापुढे असंही म्हणाल्या की अश्याप्रकारे केवळ हौस म्हणून प्राणी घरात आणणा-यांना प्राण्यांबद्दल जराही प्रेम किंवा कळवळा नसतो. केवळ भरपूर पैसे आहेत म्हणून समाजात एक 'स्टेटस सिंबॉल' मिरवण्यासाठी ही मंडळी महागडे पाळीव प्राणी पाळतात. काही विदेशी माऊंटन श्वानांच्या जाती या मुंबईसारख्या गरमीच्या ठिकाणी जगूच शकत नाहीत. जगल्या तरी त्यांचं जगणं हे त्रासदायकच ठरत. पण हल्ली इंटरनेटच्या जमान्यात जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला घर बसल्या मिळवता येणं सहज शक्य आहे, फक्त त्याची किंमत मोजायची तयारी हवी. मात्र हे करताना आपण एखाद्या मुक्या जीवावर अत्याचार तर करत नाही ना?, याची जाणीवही असायला हवी.
कोरोनाशी लढण्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे
पाळीव प्राणी बेवारस
स्वत:च्या सुरक्षिततेसाठी पाळीव प्राणी घराबाहेर सोडून देण्यामागे कोरोनाबद्दलची भिती हे मुख्य कारण आहे. यांच्यामुळे आपल्याला किंवा कुटुंबियांना कोणता संसर्ग होऊ नये’, हाच यामागचा मुख्य हेतू आहे. मात्र स्वत:चा आणि आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचा विचार करतांना समाजातील इतरांचा विचार होत नाही. पाळीव प्राणीही याच समाजाचा एक भाग आहेत, हेही लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे अश्या पाळीव प्राण्यांविषयी प्रशासनाकडंनही योग्य ते दिशानिर्देश घेऊन त्यानुसार कार्यवाही करायला हवी. अशी मागणी प्राणीमित्र संघटनांकडनं होत आहे.
सॅनिटायझर लावून दिवे लावू नका. उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचं जनतेला आवाहन
कोरोनासारखे जीवघेणे संकट समोर असतांना प्रत्येकाने स्वत:सह समाजाचाही विचार करायला हवा. अन्यथा आपल्या कोणत्याही अयोग्य कृतीमुळे इतरांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो याचं भान प्रत्येकानं राखलं पाहिजे. प्रशासन नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी विविध सूचना देत आहे. मात्र त्याच्या जोडीला पाळीव प्राण्यांबाबत निर्माण होणार्या समस्यांवरही तितक्याच तत्परतेने सूचनावजा मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे.
Nijamuddin Corona | देशभरातील 1023 कोरोना केसेस निजामुद्दीनमधील तबलीगींशी संबंधित- केंद्रीय आरोग्य मंत्रालय