कोरोनाशी लढण्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असून त्यासाठी सव्वा लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यावेळी नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन टोपे यांनी केलं.
![कोरोनाशी लढण्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे train all AYUSH doctors to fight Corona says Health Minister Rajesh Tope कोरोनाशी लढण्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/21105935/rajesh-tope.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात आवश्यक ती उपकरणे उपलब्ध असून सुमारे दीड हजार व्हेंटिलेटर, अडीच लाख एन 95 मास्क उपलब्ध असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांनी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत सोशल डिस्टंन्सिग राखावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.
आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यात आरोग्य पथकांमार्फत क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजनेतून सर्वेक्षणाबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 9 लाख लोकांचं ट्रेसिंग करण्यात आले आहे. याकामासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केले. आवश्यकता भासल्यास राज्यात आरोग्यसेवेसाठी पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ असावे यासाठी राज्यातील आर्युवेदीक, युनानी, होमिओपॅथी या आयुष डॉक्टरांची सेवा घेता यावी याकरिता त्यांना आठवडाभरात कोरोनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आजच आयुषच्या 250 मुख्य प्रशिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
9 मिनिटं घरातील केवळ दिवेच बंद करायचे; केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचं स्पष्टीकरण
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सज्ज कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेकडे पुरेसे उपकरणे आणि साधनसामुग्री आहे. 25 हजार पीपीई कीट्स, दीड हजार व्हेंटीलेटर असून अडीच लाख 95 मास्क उपलब्ध आहेत. राज्यात लवकरच नविन व्हेंटिलेटर उपलब्ध होणार असून आवश्यकता भासल्यास केंद्र शासनाकडून उपकरणांचा पुरवठा राज्याला केला जाईल, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सागितले. खासगी रुग्णालये बंद ठेवणे चूक असून डॉक्टरांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. नागरिकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवी, त्यासाठी योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप यासोबतच ‘क’ जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन करताना नागरिकांनी स्वयंशीस्त पाळावी घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
Coronavirus | लक्षण नसतानाही अनेक जण कोरनाबाधित
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)