बाळांचा मृत्यू होणं दुःखदायक; मात्र यावर राजकारण अधिक क्लेशदायक : महापौर पेडणेकर
भांडुमधील सावित्रीबाई प्रसूती गृहामध्ये गेल्या तीन दिवसांत चार बालकांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना दुःखदायक असून, यावर राजकारण अधिक क्लेशदायक असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुंबई : बाळांचा मृत्यू होणं दुःखदायक आहे, मात्र यावर राजकारण अधिक क्लेशदायक असल्याचे वक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. मी आधी आई, आता आजी झालेय, त्यामुळे बाळांचा मृत्यू होणे खूप दुःखदायक असल्याचे पेडणेकर म्हणाल्या. पेडणेकर यांनी आज भांडुमध्ये असलेल्या सावित्रीबाई प्रसूती गृहाला भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
मुंबईतील भांडुमध्ये असलेल्या सावित्रीबाई प्रसूती गृहामध्ये गेल्या तीन दिवसांत चार बालकांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यानंतर महापौर भांडुपमध्ये घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी येथील डॉक्टर अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा प्रकार कसा घडला याची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी आधी आई आता आजी झालेय, बाळांचा मृत्यू दुःखदायकच मात्र...
काल माझ्या घरी पण एक बाळ जन्माला आलं, मी पण एक आई, आता आजी असल्याचे पेडणेकर म्हणाल्या. यामध्ये जर डॉक्टरांचा काही हलगर्जीपणा असेल तर त्याचा शोध घेतला जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल असे त्या म्हणाल्या. असा प्रकार पुन्हा घडू नये याची काळजी घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. या प्रकरणाचे अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार आहे. आपल्याला याचे कारण अद्याप कळालेलं आहे, अजून काही रिपोर्ट यायचे आहेत, ते आल्यावर आपल्याला नक्की कळेल असेही त्या म्हणाल्या. दरम्यान या घटनेवरुन कोणीही राजकारण करू नये, असेही त्या म्हणाल्या.
भांडुप येथील पालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात एका आठवड्यात चार अर्भकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटले. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास निलंबित करण्यात करण्यात आल्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहातील अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षातील चार अर्भकांचा जंतूसंसर्गाने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. आणखी एक बालक अत्यवस्थ आहे. नवजात अर्भकांसाठी असलेल्या अतिदक्षता कक्षामधील दुरवस्थेमुळे बालकांना जंतुसंसर्ग झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून, रुग्णालयाच्या अर्भक अतिदक्षता विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सात दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: