Corona New Guidelines : राज्यात लागू शकतात 'हे' निर्बंध; आजपासून नाईट कर्फ्यू, कार्यक्रमांवरही बंधनं
Maharashtra Corona Omicron new guidelines restrictions : आजपासूनच राज्यात निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. यात नेमके काय निर्बंध असू शकतात याबाबत जाणून घेऊयात...
Maharashtra Corona Omicron Third Wave : महाराष्ट्रासह देशात (Maharashtra Corona Omicron Update) वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे काल निश्चित झालं आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून नवे निर्बंध घोषित होणार आहेत. याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. काल यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. दरम्यान आजपासूनच राज्यात निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. यात नेमके काय निर्बंध असतील याबाबत एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
टास्क फोर्सच्या कालच्या बैठकीत काय झालं
राज्यभरात रात्रीची जमावबंदी लागू होणार
5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत
असे असू शकतात निर्बंध
लग्नसमारंभ, कार्यक्रम यांवरही निर्बंध
100 जणांनाच परवानगी, आधी ही मर्यादा 200होती
बंदिस्त जागेतील कार्यक्रम
समारंभ , लग्न, इतर कार्यक्रम यांकरता 100 लोकांनाच परवानगी
25 % किंवा 100 यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू
खुल्या जागेतील कार्यक्रम
50% किंवा 100 यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू 100 लोकांनाच परवानगी
रेस्टॉरंट-
50% क्षमतेने सुरु राहणार,
प्रशासनाचं आता हॉटेल ,रेस्टॉरंटकडे बारकाईनं लक्ष असेल
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदी
फटाके फोडता येणार नाहीत, आतिषबाजी नाही
मुंबईची स्थिती काय
3 महिन्यांनंतर मुंबईत अचानक रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय
ऑक्टोबरमध्ये मुंबईतील दरदिवशी वाढणारी रुग्णसंख्या 550-600 होती...
3 महिन्यांनंतर रुग्णसंख्या वाढ बघायला मिळतेय
मुंबईत दरदिवसाला 45 हजार टेस्टिंग होत आहेत
काल बैठकीत टास्क फोर्सचा भर कशावर होता?
- जलद लसीकरण मोहिम
- बुस्टर डोसबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणे, किमान हेल्थ/फ्रंटलाईन वर्कर्सला बुस्टर डोस मिळावा
- केंद्राकडे लहानमुलांच्या लसीकरणासाठी पाठपुरावा करावा
नवाब मलिक नेमकं काय म्हणाले...
नवाब मलिक यांनी म्हटलं की, काल कॅबिनेटमध्ये कोविडबाबत चर्चा झाली. कॅबिनेटमध्ये आराखडा देत असताना लक्षात आलं की कोरोना रुग्णांमध्ये रोज 18 टक्क्यांनी वाढ होत आहे. ओमायक्रॉनचे संकट वाढत चाललं आहे. यामुळं जानेवारीत तिसरी लाट येऊ शकते, असं मलिक यांनी म्हटलं आहे. हायकोर्टाने सांगितलं आहे की तिसरी लाट येऊ शकते त्यामुळे निवडणूक पुढे ढकलायली हवी. जर निवडणूका झाल्या नाहीत तर राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. पंजाबमध्ये अशी परिस्थिती होऊ शकते, असंही मलिक म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :
ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय, रात्रीची संचारबंदी लावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यांना आदेश
ओमायक्रॉनचं संकट! राजधानी दिल्लीत सतर्कता; नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी