एक्स्प्लोर

स्फोटकप्रकरणी आणखी दोघे अटकेत, ATS ची धडक कारवाई सुरुच

वैभव राऊतच्या नालासोपाऱ्यातील घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केल्यानंतर पोलिसांचं पथक पुन्हा तिथे दाखल झाले आहेत. वैभव राऊतच्या घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही पोलिस तपासणार असून, यातून मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई : नालासोपाऱ्यातून वैभव राऊत याला महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथकाने अटक केल्यानंतर, आणखी दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. शरद काळसकर आणि गोंधळेकर अशा आणखी दोघांना वसईतून अटक करण्यात आली. वैभव राऊत याच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. मुंबई सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती समीर अडकर यांच्या विशेष न्यायालयात वैभव राऊतसह अन्य दोन आरोपींना हजर करण्यात आले आहे. तिघांनाही 15 दिवसांची पोलिस कोठडी सुनवावी, अशी मागणी एटीएसकडून करण्यात आली आहे. वैभव राऊतच्या नालासोपाऱ्यातील घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केल्यानंतर पोलिसांचं पथक पुन्हा तिथे दाखल झाले आहेत. वैभव राऊतच्या घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही पोलिस तपासणार असून, यातून मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहे प्रकरण? महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने नालासोपाऱ्यातील वैभव राऊत या व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली. भांडारअळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून एटीएसने ही स्फोटकं जप्त केली. महत्त्वाचं म्हणजे वैभव राऊत हा कट्टर हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी संलग्न आहे. एटीएसने गुरुवारी रात्री ही धडक कारवाई केली. या धाडीत 8 देशी बॉम्ब मिळाले. तर घरापासून काही अंतरावर असणाऱ्या त्याच्या दुकानात बॉम्ब बनविण्यासाठी लागणारी सामुग्रीही मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये गन पावडर आणि डिटोनेटर यांचा समावेश आहे. या सामुग्रीमध्ये 2 डझन पेक्षा जास्त देशी बॉम्ब बनविले जातात. सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या घरी इतकी मोठी स्फोटकं कशासाठी एकत्र केली होती, याचा तपास आता एटीएस करत आहे. एटीएसला वैभव राऊतकडे स्फोटकं असल्याची टिप मिळाली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून एटीएसने सापळा रचला होता. गुरुवारी रात्री खात्री करुन वैभव राऊतच्या घरी धाड टाकली असता, एटीएसला स्फोटकांचा साठा आढळला. पोलिसांनी वैभवाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केली आहे. एटीएसने या कारवाईनंतर डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीम यांनाही बोलावून तपासणीही केली. गुरुवारी रात्रभर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वैभव राऊतच्या घरी सर्च ओपॅरेशन केलं. मिळालेले बॉम्ब, त्यासाठी लागणारी सामुग्री ही कुठून आणली, हे बॉम्ब कशासाठी बनविले जात होते, याचा सर्व तपास आता सुरु आहे. सनातनची प्रतिक्रिया वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही, पण तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता, त्याच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही, पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, गृहमंत्री वारंवार सनातन संस्थेला बदनाम करत आहेत. वैभवला शक्य ती सर्व मदत करु, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी एबीपी माझाला दिली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri Chinchwad: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
Uddhav Thackeray: उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
Embed widget