Ashish Shelar : ठाकरे सरकारच्या बिल्डरांच्या प्रिमियम माफीमुळे महापालिकेचे डिपॉझिट घटले; आशिष शेलार यांचा आरोप
Ashish Shelar : शिंदे सरकार आल्यानंतर विकास कामे सुरू झाली, विकास कामांना निधी वापरला गेला. त्यामुळे मालमत्तांमध्ये साडेचौदा टक्के वाढ झाली असं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले.
मुंबई : ठाकरे सरकारच्या काळात मुंबईतील बिल्डरांना केलेला 50 टक्के प्रिमियम माफीमुळे मुंबई महापालिकेच्या (BMC) डिपॉझिटमध्ये घट झाली, असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड अशी शेलार (Ashish Shelar) यांनी येथे केला. महायुतीतर्फे आज मुंबई उपनगराचा मेळावा रंग शारदा सभागृहात तर शहर विभागाचा मेळावा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पार पडला. यावेळी केलेल्या भाषणामध्ये मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड शेलार यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
तत्कालीन पर्यावरण मंत्री आणि वरळीचे आमदार कुठे भेटतील का? म्हणून वरळीतील लोक त्यांना शोधत आहेत. वरळीतून आमदार गायब, अशी स्थिती आहे. यांचे विमान कधी जमिनीवर येतच नाही, अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेतला जोरदार टीका केली.
मुंबई महापालिकेची डिपॉझिट कमी झाली म्हणून आता ओरडत आहेत. शिंदे सरकार आल्यानंतर विकास कामे सुरू झाली, विकास कामांना निधी वापरला गेला. त्यामुळे मालमत्तांमध्ये साडेचौदा टक्के वाढ झाली. पुल उभे राहिले, रस्ते उभे राहिले. डिपॉझिट कमी होण्याचे खरे कारण तत्कालीन ठाकरे सरकारने बिल्डरांवर 50 टक्के प्रीमियम माफीची खैरात केली. त्यामुळे महापालिकेतील तिजोरीत येणारा निधी आला नाही आणि त्यामुळेच महापालिकेचे डिपॉझिट कमी झाले, असा आरोपी आमदार अशी शेलार यांनी केला.
उपस्थितांना आव्हान करताना आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, सकाळी नऊ वाजता टीव्ही बघू नका. पत्रकार पोपटलाल बोलत राहतील. छत्री घेऊन फिरतात, कधी मान अशी, कधी हात असा, बाकी काही नाही. राज्याला देण्यासारखं काही नाही. या पत्रकार पोपटलाल आणि कंपनीने मुंबईचे केलं तेवढं नुकसान अन्य कोणीच केले नाही.
दोन्ही मेळाव्याला महायुतीच्या सर्व पक्षांचे आमदार, खासदार, पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्धव ठाकरे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतींना काळाराम मंदिरातील उपस्थितीबद्दल लिहलेल्या पत्राविषयी बोलताना मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, आज लवकर सकाळी उठल्यामुळे त्यांची डोळ्यावरची झोप आणि झडप गेली नसावी म्हणून उद्धव ठाकरे यांना काही घडलेल्या आणि सत्य घटनांचे ज्ञान नाही. संजय राऊत यांनी त्यांना दिलेली स्क्रिप्ट मुद्दामहून अडचणीत आणणारी आणि चुकीची दिलेली असावी. उद्धव ठाकरे आमच्या विश्व हिंदू परिषदेच्या ट्विटर हँडलवर जरी केले असते तरी त्यांना दिसले असते की, कालच देशाच्या राष्ट्रपतींना विश्व हिंदू परिषदेने निमंत्रण दिले आहे आणि हे 24 तासानंतर जागे झाले आहेत. त्यामुळे निमंत्रण राष्ट्रपतींना पोहोचले आहे. यांनी सांगण्याची काही गरज नाही. यांच्या सांगण्यावरून कुणाला आम्ही निमंत्रण देणार नाही आणि हे बोलले म्हणून यांनाही आम्ही निमंत्रण देणार नाही.
ही बातमी वाचा :