एक्स्प्लोर

कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या 'आशा' कर्मचाऱ्यांची हायकोर्टात धाव

वेतनाच्या मुद्यासह त्यांच्या इतर समस्या त्वरीत मार्गी लावा, त्यासाठी कोर्टाच्या आदेशांची वाट पाहू नका : हायकोर्ट. मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश.

मुंबई : राज्यातील विविध शहरांत आणि जिल्ह्यात कोरोना संशयितांचे सर्व्हेक्षण करण्यास अग्रस्थानी असलेल्या आशा सेविकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती. यात आशा कर्मचाऱ्यांचे थकित वेतन आणि इतर प्रश्नांवर त्वरित निर्णय घ्यावेत, त्यासाठी न्यायालयाच्या पुढील आदेशांची वाट बघू नये, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. शहरी भागातील आशा कर्मचाऱ्यांचे थकित वेतन देण्याबाबतचा राज्य सरकारचा सप्टेंबर 2019 चा शासकीय निर्णय लागू (जीआर)करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेवक संघाच्यावतीने अॅड. भावेश परमार आणि अॅड. राहुल गायकवाड यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, राज्यात जवळपास 72 हजार आशा कर्मचारी आहेत. त्यातील 62 हजार कर्मचारी ग्रामीण भागात कार्यरत असून त्यांचे मासिक वेतन हे 4 हजार रुपये आहे. तर 5 हजार कर्मचारी शहरात असून त्याचे दरमहा वेतन हे 2 हजार 500 रूपये आहे. स्थलांतरित मजुरांकडून रेल्वे अथवा बसचे भाडे घेऊ नका; सुप्रीम कोर्टाचा आदेश आशा सेविकांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्य सरकारच्या त्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. आपल्या लाभांपासून वंचित राहूनही 72 हजार आशा कर्मचारी टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा देण्याचे कार्य करत असल्याची बाब याचिकाकर्त्यांच्यावतीने खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. कोरोनाच्या बिकट प्रसंगात एक कोरोना योद्धा म्हणून अविरत काम करणाऱ्या या आशा कर्मचाऱ्यांसाठी अध्यादेश आणि परिपत्रक कार्यान्वित करण्याचे कोणतेही प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आले नसल्याचेही त्यांना सांगितले. त्यांची बाजू ऐकून घेत महाराष्ट्र राज्याचा संबंधित सचिवांनी याचिकाकर्त्यांच्या तक्रारीकडे लक्ष द्यावे. त्यातील मुद्दे न्याय्य असतील आणि त्यानुसार कार्यवाही करावी. त्यासाठी न्यायालयाच्या पुढील आदेशांची वाट न पाहता आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकाला दिले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या आरोग्य विभागालाही प्रतिवादी करण्याचे स्वातंत्र्यही याचिकाकर्त्यांना देत हायकोर्टानं ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली. Pawar's letter to PM | बांधकाम व्यावसायिकांच्या कर्जाचं पुनर्गठन करा, शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget