शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिला मातोंडकरांकडून कोट्यवधींच्या ऑफिसची खरेदी
मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये अभिनेत्री आणि कलाविश्वाकडून राजकीय वर्तुळाकडे वळलेल्या उर्मिला मातोंडकर यांच्या नावाच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा रंगण्यमामागची कारणंही तशीच होती.
मुंबई : मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये अभिनेत्री आणि कलाविश्वाकडून राजकीय वर्तुळाकडे वळलेल्या उर्मिला मातोंडकर यांच्या नावाच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा रंगण्यमामागची कारणंही तशीच होती. कंगना राणौतपासून वाद असो किंव मग शिवसेनेतील पक्ष प्रवेश असो. उर्मिला यांच्या नावाभोवती चर्चांचा गराडा पाहायला मिळालाच. आता म्हणे शिवसेनेच प्रवेश केल्यानंतर काही आठवड्यांतच उर्मिला यांनी मुंबईच्या प्रसिद्ध भागात एक नवं ऑफिस खरेदी केलं आहे.
मुंबई मिररच्या वृत्तानुसार 2020 या वर्षाच्या अखेरीसच या जागेचा अंतिम व्यवहार करण्यात आला. जवळपास 1000 चौरस फुटांची ही जागा मोक्याच्याच ठिकाणी असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील खार पश्चिम भागात असणाऱ्या लिंकिंग रोड इथं त्यांच्या ऑफिसची इमारत आहे. शिवाय इथं कार्यालयीन जागांसाठी दरमहा 5-8 लाख रुपये इतकं भाडं आकारलं जातं, अशीही माहिती समोर येत आहे.
Weather Updates | देशातील 'या' भागात हवामान खात्याकडून ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा
उर्मिला यांचं नवं ऑफिस इथं सहाव्या मजल्यावर आहे. एका व्यावसायिकाकडून त्यांनी या जागेची खरेदी केली असून, यासठी तब्बल 3.75 कोटी इतकी मोठी रक्कम मोजल्याचं म्हटलं जात आहे.
विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांमध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना आधीच उमेदवारी दिली होती. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यात भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. या पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकर यांनी पक्षाला रामराम केला होता.