Aryan Khan Drugs Case: आर्यन खान प्रकरणी नव्या खुलाश्यानंतर नवाब मलिक यांचं वक्तव्य, म्हणाले..
Aryan Khan Drugs Case: प्रभाकरने सांगितले की, तो किरण गोसावीचा खाजगी अंगरक्षक म्हणून काम करतो. क्रूझ पार्टीच्या छाप्यावेळी ते गोसावी यांच्यासोबत होते.
Aryan Khan Drugs Case: आर्यन खान प्रकरणातील मुख्य साक्षीदार केपी गोसावीचा अंगरक्षक प्रभाकर साईलच्या खुलाश्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी याची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटून या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल केली जात होती. चौकशी झाली तर अनेक मोठे खुलासे होतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केलीय.
नवाब मलिक म्हणाले की, एनसीबीच्या साक्षीदाराने ज्या प्रकारे खुलासा केलाय तो गंभीर आहे. समीर वानखेडे या विभागात आल्यापासून त्यांनी चित्रपट उद्योगाला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे ते म्हणाले. करोडो रुपये वसूल करण्याचे काम केले जात होते.
नवाब मलिक म्हणाले की, दोन खटले सुरू आहेत पण वर्षभरात एकही अटक झालेली नाही. लोकांना बोलावले जाते आणि त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. खोट्या केसेस केल्या जातात. चौकशी झाली तर आणखी खुलासे होतील. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे एसआयटीची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत.
ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबी सांगत असलेला मुख्य साक्षीदार किरण गोसावी एक सराईत गुन्हेगार!
मुख्य साक्षीदार असलेला पी गोसावीच्या अंगरक्षकाने या प्रकरणात मोठा खुलासा केल्याने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. एनसीबीच्या कार्यालयात पंचनामा पेपर असल्याचे सांगत कोऱ्या कागदावर बळजबरीने स्वाक्षरी घेतल्याचे बॉडीगार्ड प्रभाकरने नोटरीकृत प्रतिज्ञापत्रात सांगितले. वास्तविक क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेबद्दल त्याला जास्त माहिती नव्हती. प्रभाकर हे क्रूझ ड्रग्ज प्रकरणात केपी गोसावींव्यतिरिक्त आणखी एक साक्षीदार आहेत.
कोण आहे प्रभाकर साईल
- प्रभाकर साईल हे क्रुझ कारवाई प्रकरणातील प्रथम क्रमांकाचे नाव असणारे पंच आहेत.
- हा पंच किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड आहे.
- किरण गोसावींकडेच याची राहण्याची व खाण्याची व्यवस्था आहे.