Prabhakar Sail : प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणी पोलीस चौकशी होणार; गृहमंत्री वळसे-पाटील यांचे आदेश
Prabhakar Sail Death Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर सैल याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
Prabhakar Sail Death Case : कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. पोलीस महासंचालकांना याबाबतचे आदेश दिले असल्याचे त्यांनी म्हटले. शुक्रवारी दुपारी प्रभाकर साईलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले की, साईलच्या मृत्यूमुळे संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसात प्रभाकर साईलच्या मृत्यू प्रकरणी चौकशी अहवाल येण्याची शक्यता आहे.
कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. एनसीबीने केलेल्या या कारवाईत प्रभाकर साईल हा पंच होता. एनसीबीच्या या कारवाईवरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. साईल हा एनसीबीच्या कारवाईत असलेल्या किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता. एनसीबीने केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आरोप सुरू केल्यानंतर साईलने केलेल्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली होती.
सीआयडी चौकशी करा, राष्ट्रवादीची मागणी
प्रभाकर साईल यांचा मृत्यूमागे घातपाताची शक्यता व्यक्त करत राष्ट्रवादीनं सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे की, कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने फर्जीवाडा करुन केलेल्या कारवाईतील एनसीबीचा पंच आणि एनसीबीचा फर्जीवाडा प्रतिज्ञापत्राद्वारे उघड करणारा प्रभाकर साईल याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी आहे मात्र या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असून राज्यसरकारने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.
इतर महत्त्वाची बातमी:
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha