(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aryan Khan Bail : आर्यन खानला अखेर जामीन, आज कारागृहातून सुटकेची शक्यता, अटींची पूर्तता न केल्यास जामीन रद्द होणार
Aryan Khan Bail : बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन मंजूर झाला. मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी आर्यन खानला अटक करण्यात आली होती.
Aryan Khan Bail : मुंबई क्रूझ ड्रग्ज (Mumbai Drug Case) प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खानची अखेर 25 दिवसांनी जामीनावर सुटका झाली. परंतु, निकालाची प्रत आज मिळणार असल्यानं आर्यनला जामीन मिळाल्यानंतरही आणखी एक रात्र तुरुंगातच काढावी लागली. आर्यन खान आज तुरुंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात काल (गुरुवारी) पार पडलेल्या सुनावणीमध्ये आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला जामीन मंजूर केला. मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानची बाजू माजी अटॉर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी मांडली. तर एनसीबीच्या वतीनंही जामीन फेटाळण्यासाठी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर अखेर आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला जामीन मंजूर करण्यात आला.
जामीन दिला, पण काही अटी कायम
जामीन देण्यासोबतच उच्च न्यायालयानं आर्यन खानला काही अटीं आणि नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. अटींनुसार, उच्च न्यायालयानं आर्यन खानला इतर कोणत्याही आरोपीसोबत संपर्क साधता येणार नाही. याव्यतिरिक्त स्पेशल कोर्टाच्या कारवाईला कोणत्याही प्रकारे अडथळे निर्माण होतील, असं काहीही आर्यन खाननं करु नये. तसेच जामीन अर्ज मंजूर करताना उच्च न्यायालयानं आर्यन खानला आपला पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
... अन्यथा जामीन रद्द होणार
जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान, म्हटलं गेलं की, आर्यन खान उच्च न्यायालयानंच्या परवानगीशिवाय देश सोडू शकत नाही. या दरम्यान, उच्च न्यायालयानं हेदेखील म्हटलं की, आर्यन खान जर मुंबईतूनही बाहेर जाणार असेल तर याबाबतची माहिती त्यानं या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांना आधीच देणं आवश्यक आहे. या दरम्यान, उच्च न्यायालयानं हेदेखील म्हटलं की, जर आर्यन खाननं अटी मान्य करुन त्यांचं पालन केलं नाही, तर मात्र त्याचा जामीन रद्द होऊ शकतो.
शाहरुखच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण
आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. शाहरुख खानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमा झाली होती. शाहरुखच्या फॅन्सनी त्यांच्या घराबाहेर येत आनंद साजरा केला. एएनआयनं जारी केलेल्या व्हिडीओनुसार, शाहरुख खानचा लहान मुलगा अबराम आनंदी असून तो घराबाहेर जमलेल्या लोकांना अभिवादन करत होता.
दरम्यान, मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया या आलिशान क्रुझवर एनसीबीने 2 ऑक्टोबरला धाड टाकली होती. यावेळी ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा आणि अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. आर्यनसह अरबाज आणि मूनमून धमेचाच्या वतीनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली.
Aryan Khan : आर्यन खान जामीनावर कसा सुटला? जाणून घ्या शेवटच्या दिवशी काय युक्तीवाद करण्यात आला
मुलगा आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खाननं घेतली वकिलांची भेट
ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, मॉडेल मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर 26 व्या दिवशी जामीन मिळाला. सध्या त्यांची सुटका होण्यासाठी एक ते दोन दिवस लागतील. मात्र, याबाबत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसरीकडे आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये शाहरुख खान हसताना दिसत आहे.
आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले, "आर्यन शाहरुख खानला अखेर हायकोर्टातून जामीन मिळाला आहे. 2 ऑक्टोबर रोजी अटकेच्या पहिल्या दिवसापासून या प्रकरणात कोणताही पुरावा नाही, कोणताही उपभोग नाही, कोणताही कट नाही. आणि आता काहीही नाही. ." आमची प्रार्थना न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी मान्य करून आर्यनला जामीन मंजूर केल्याचे वकिलांनी सांगितले.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबई किनार्यावरील एका क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर अटक करण्यात आली होती. न्यायमूर्ती एन डब्ल्यू सांबरे यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही जामीन मंजूर केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :