एक्स्प्लोर

Aryan Khan Bail Plea Hearing : मुलाच्या जामीनासाठी शाहरुखकडून तिसऱ्या वकिलाची नेमणूक; मुकूल रोहतगी हायकोर्टात आर्यन खानची बाजू मांडणार

Aryan Khan Bail Plea Hearing : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त कोर्टाचं कामकाज बंद होण्याआधी जामीन मिळवण्याचा आर्यनच्या वकीलांचा प्रयत्न असेल. आर्यनच्या वकिलांसमोर 30 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे.

Aryan Khan Bail Plea Hearing : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. यावेळी आर्यन खानच्या वतीने माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी उच्च न्यायलात बाजू मांडणार आहेत. गेल्या आठवड्यात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टानं आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त कोर्टाचं कामकाज बंद होण्याआधी जामीन मिळवण्याचा आर्यनच्या वकीलांचा प्रयत्न असेल. आर्यनच्या वकिलांसमोर 30 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे. कारण त्यानंतर 12 दिवस कोर्टाला दिवाळीची सुट्टी असणार आहे. जर या पाच दिवसांत कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन कोर्टाने आपला निर्णय दिला नाही तर आर्यन खानला दिवाळीपर्यंत जेलमध्येच राहावं लागेल. 

मुंबई क्रूझ ड्रग्स (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. गेल्या 18 दिवसांपासून आर्यन खान अटकेत आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात मंगळवारी (आज) सुनावणी पार पडणार आहे. 

आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळले आहेत. या सुनावणी दरम्यान न्यायालयात कोणताही युक्तिवाद झाला नाही. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या वकिलांनी यापूर्वीच युक्तीवाद पूर्ण केले होते. सुनावणी पूर्ण झाल्यावर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. न्यायाधीशांनी कोर्टात आल्यावर थेट निर्णय जाहीर केला. आर्यन खानच्या वकीलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. आर्यन खानच्या वकिलांना निकालाची तपशीलवार प्रत मिळताच त्यांनी न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यापुढे जामीन अर्ज सादर केला आणि गुरूवारी म्हणजेच, आजच तातडीची सुनावणी घेण्याचा विनंती अर्जही सोबत दाखल करण्यात आला होता. आर्यन खानचे वकील, बचाव पक्षाचं म्हणणं आहे की, अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळतो, परंतु या प्रकरणात असं झालं नाही. 

...तर आर्यन खानची दिवाळीही तुरुंगातच!

आर्यनच्या वकिलांसमोर 30 ॲाक्टोबर पर्यंतचा वेळ आहे. कारण त्यानंतर 12 दिवस कोर्टाला दिवाळीची सुटी असणार आहे. जर या 7 दिवसांत कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन कोर्टाने आपला निर्णय दिला नाही तर, आर्यन खानला दिवाळीपर्यंत  जेलमध्येच रहावे लागेल. कोर्टात एनसीबीने आर्यनचे संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीयाशी असल्याचा आरोप करत एनडीपीएस अॅक्टच्या कलम 29 अ अंतर्गत आर्यनच्या जामीनाला विरोध केला जो कोर्टाने मान्य केला. एनसीबीला आर्यन खानच्या विदेशी दुव्यांचा संशय आहे. आर्यन खानला एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी अटक केली. एनसीबीला आर्यन खानकडून ड्रग्ज किंवा रोख रक्कम मिळाली नाही. कोर्टात एनसीबीने म्हटले होते की, आर्यन खान अरबाज मर्चंटकडे सापडलेल्या ड्रग्जचं सेवन करणार आहे. एनसीबी आर्यन खानचे ड्रग्ज चॅट, परदेशी लिंक्सचे पुरावे असल्याचा दावा करत आहे. एनसीबीने युक्तिवादात आर्यन खानच्या ड्रग्ज चॅटचा ही उल्लेख केला, ज्यात तो परदेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागताना दिसला होता. एनसीबीला आर्यनने ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा संशय आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
Embed widget